Nanded News : पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू; लोहा तालुक्यातील बेटसांगवीची घटना

बेट सांगवी शिवारात विनायक आत्माराम वानखेडे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास संतोष वानखडे व राजेश वानखडे हे दोघे पोहण्यासाठी गेले होते.
drowned
drowned Sakal
Updated on

नांदेड : पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.९) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बेटसांगवी (ता. लोहा) शिवारात घडली. संतोष सखाराम वानखडे (वय १८) व राजेश गणेश वानखडे (वय १७) असे मृतांची नावे आहेत. दोघेही बेटसांगवी (ता. लोहा)येथील रहिवासी आहेत.

बेट सांगवी शिवारात विनायक आत्माराम वानखेडे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास संतोष वानखडे व राजेश वानखडे हे दोघे पोहण्यासाठी गेले होते. विहिरीत पोहत असताना पाण्यात बुडून बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी विष्णुपुरी येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सोनखेड ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com