
नांदेड : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना बुधवारी (ता.२) घडल्या. शिव मंदिराजवळील एमएसईबी डीपीला लागलेल्या आगीत खाली उभ्या असलेल्या चार भंगार गाड्या जळून खाक झाल्या, तर श्याम नगरमधील दवाखान्यात एमसीबी बोर्डला आग लागली. अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे मोठे नुकसान टळले.