दोनशे रुग्णांची शनिवारी कोरोनावर मात, नऊ जणांचा मृत्यू; १२२ जण पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे
Saturday, 22 August 2020

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात १२२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या चार हजार ९४३ वर पोहचली आहे.

नांदेड : शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णापैकी शनिवारी (ता.२२) तब्बल दोनशे रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, शासकीय रुग्णालयातील सात, जिल्हा रुग्णालयातील एक व खासगी रुग्णालयातील एक अशा नऊ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १२२ स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
 
शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात १२२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या चार हजार ९४३ वर पोहचली आहे. पंजाब भवन कोविड सेंटर येथील १४४, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील पाच, जिल्हा रुग्णालय एक, धर्माबाद कोविड सेंटर ३४, बिलोलीत चार, मुखेडला पाच, नायगाव कोविड सेंटरचे दोन, हैदराबाद संदर्भित एक, खासगी रुग्णालयातील चार असे एकुण दोनशे रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत तीन हजार ४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचा- दाभोलकर - पानसरे हत्येच्या तपासाचे काय? - आमदार राजूरकरांचा सवाल.... ​

नऊ रुग्णांचा मृत्यू

शनिवारी ७८७ स्वॅब अहवाल प्राप्त झाले यात ६२१ निगेटिव्ह तर १२२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या चार हजार ९४३ इतकी झाली आहे. दुसरीकडे उपचार सुरु असलेल्या शासकीय रुग्णालयातील संघमित्र कॉलनीतील पुरुष (वय ५१), असर्जन येथील पुरुष (वय ९०), तामसा (ता. हदगाव) येथील महिला (वय ४२), भावसार चौकातील पुरुष (वय ७०), कंधारचा पुरुष (वय ५३), लोहातील पुरुष (वय ३३), छोटीगल्ली कंधारमधील पुरुष (वय ६२), जिल्हा रुग्णालयातील माद्री कॉलनीतील पुरुष (वय ६०), खासगी रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या विसावानगर येथील पुरुष (वय ६८) या नऊ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूसंख्या १७७ वर पोहचली आहे. 

हेही वाचा- Video - वझरा शेख फरीद धबधबा पर्यटकांविनाच कोसळतोय, कुठे ते वाचाच ​

तालुकानिहाय शुक्रवारी आढळलेले रुग्ण 

नांदेड शहर - ५४, नांदेड ग्रामीण - चार, अर्धापूर -एक , हदगाव - सात, कंधार - सहा, मुखेड - १५, धर्माबाद - १३, बिलोली - एक, देगलूर - एक, मुदखेड - तीन, भोकर - दोन, नायगाव - एक, लोहा - दोन, माहूर- पाच, किनवट - चार, हिंगोली - दोन व निझामाबाद येथील एक असे एकूण १२२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नांदेड कोरोना मीटर 

एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ५० हजार ९८४ 
एकूण घेतलेले स्वॅब - ३४ हजार ८९ 
एकूण निगेटिव्ह स्वॅब - ३७ हजार ३६८ 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - चार हजार ९४३ 
आज शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण - १५१ 
आज शनिवारी मृत्यू - नऊ 
एकूण मृत्यू - १७७ 
आज शनिवारी रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - २०० 
आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - तीन हजार ४७ 
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - एक हजार ६३२ 
सध्या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - ११८ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hundred Patients Beat The Corona On Saturday Nine Died And 122 Tested Positive Nanded News