
हणेगाव (जि. नांदेड) : देगलूर तालुक्यातील हणेगावजवळ बसच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण ठार झाले. ही घटना शनिवारी (ता.१२) सकाळी घडली. नरसिंग एकनाथ पाटील (वय ७०, रा. कामाजीवाडी) व सोपानराव बिरादार (६०, रा. कुडली) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. तर, दोन जण जखमी झाले.