नांदेडात ३२ पोलिस कर्मचाऱ्यांना दोन स्टार, अखेर स्वप्न पूर्ण 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 21 October 2020

राज्य शासनाने मंगळवारी (ता. २१) पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार पोलिस उपनिरीक्षक २५ टक्के कोट्यातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिस अंमलदार म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ३२ पोलिस अमलदारांना सेवा जेष्ठतेचा लाभ मिळाल्याने त्यांना पदोन्नती मिळाली आहे. 

नांदेड : राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील १०६१ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३२ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असल्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी काढले आहेत.

राज्य शासनाने मंगळवारी (ता. २१) पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार पोलिस उपनिरीक्षक २५ टक्के कोट्यातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिस अंमलदार म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ३२ पोलिस अमलदारांना सेवा जेष्ठतेचा लाभ मिळाल्याने त्यांना पदोन्नती मिळाली आहे. 

हेही वाचाकलंबर कारखान्याची विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याचा जिल्हा बॅंकेत ठराव -

त्यापैकी सहाय्यक पोलिस फौजदार ३० आणि हवालदार दोन आहेत

सपोउपनि/५१७९ सयद अहेमद मोहसीन जाफरी, सपोउपनि/ ५२१३ जयसिंग अंबु राठोड, सपोउपनि/५२०७ अंकुश शंकरराव तिडके, सपोउपनि/५०७९ कल्याण किशनराव मांगुळकर, सपोउपनि/ ५०८८ महेबूब जलालबेग मोगल, सपोउपनि/५११२ रमेश शंकरराव खाडे, सपोउपनि/५२११ जुम्माखान अंबियाखान पठाण, सपोउपनि/५००२ यादव केरबा जांभळीकर,सपोउपनि/५२७५ नागनाथ चंद्रराव सुर्यतळे,सपोउपनि/५१८४ किशोर मक्काजीराव पवनकर,सपोउपनि/५२७९ देवराव विठ्ठलराव केदार, सपोउपनि/५२६२ विश्वनाथ रामराव केंद्रे, सपोउपनि/५२८० मुनीरोद्दीन बशिरोद्दिन सय्यद, सपोउपनि/५११७ कृष्णा नागनाथ गुंजकर,सपोउपनि/५१७७ लहू रामजी घुगे, पोहवा/ २६ जमील रफत मिर्झा,सपोउपनि/५०५९ मोहीयोद्दीन जहुरोद्दिन सय्यद, सपोउपनि/५०३३ झियाउलहक सुलेमान शेख, सपोउपनि/५२५९ प्रकाश शामराव कुंभारे, सपोउपनि/५२६३ अब्दुलरब अब्दुलअली शेख, सपोउपनि/५१६७ बळीराम व्यंकटराव राठोड,सपोउपनि/५२२४ सूर्यकांत मारोती कांबळे, सपोउपनि/५०१४ भागवत सखाराम सावंत, सपोउपनि/५२१५ एकनाथ गेंदु देवके,सपोउपनि/५२१९ मारुती गोपाळराव सोनकांबळे, चासपोउपनि/ ५०३६ सुरजीतसिंग किशनसिंग माळी, सपोउपनि/५०४३ घनश्याम परशुराम वडजे,
पोहवा/१२०२ मुरलीधर दुधराम राठोड, सपोउपनि/५०५७ अनिल गंगाधर पांडे, सपोउपनि/५०५८ कृष्णा रामभक्त काळे, सपोउपनि/५०१७ गोविंद बालाजीराव जाधव, सपोउपनि/५००९ प्रशांत नागोराव जाधव.

येथे क्लिक करावाळूचोरीच्या भानगडीत पडू नका

पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

दरम्यान राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नती झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two stars for 32 police personnel in Nanded, finally a dream come true nanded news