युरियाचा दोन हजार टन बफर स्टॉक; नांदेड कृषी विभागाची माहिती

जिल्ह्याचे पेरणी क्षेत्र लक्षात घेता जिल्ह्यासाठी दोन लाख दोन हजार ४२० मेट्रिक टन खताचा सरासरी वापर होतो. यात युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते, एसएसपी या खतांचा समावेश आहे. कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे दोन लाख ८ हजार ९३० मेट्रिक टन खताची मागणी केली होती.
नांदेडमध्ये युरियाचा बफर स्टाॅक
नांदेडमध्ये युरियाचा बफर स्टाॅक

नांदेड : खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्ह्याला लागणार्‍या खतपुरवठ्यानुसार खताचा पुरवठा होत आहे. आज घडीला ७६ हजार १४७ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यात युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते तसेच एसएसपी या खताचा समावेश आहे. तसेच दोन हजार मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

जिल्ह्याचे पेरणी क्षेत्र लक्षात घेता जिल्ह्यासाठी दोन लाख दोन हजार ४२० मेट्रिक टन खताचा सरासरी वापर होतो. यात युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त

खते, एसएसपी या खतांचा समावेश आहे. कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे दोन लाख ८ हजार ९३० मेट्रिक टन खताची मागणी केली होती.

हेही वाचा - मध्य प्रदेशातील आकर्षण असलेला हा किल्ला सर्वात जुना आणि पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र आहे

यानुसार एप्रिल २०२१ पर्यंत जिल्ह्याला ८२ हजार ९६६ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. तर मागील वर्षीचे ९३ हजार ६६५ टन असे एकून जिल्ह्यात एक लाख ७६ हजार ६३१ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक होता. यापैकी सध्या चालू असलेल्या खरीप हंगामात एक लाख ४६४ टन खताची विक्री झाली. तर अद्याप ७६ हजार १४७ टन युरिया रासायनिक खते शिल्लक आहेत. शिल्लक खतांमध्ये युरिया १४ हजार ८६८ टन, एमओपी नऊ हजार ९७७ टन, संयुक्त खते ३४ हजार ७०० टन, एसएसपी ८ हजार १११ असा एकूण ७६ हजार १४७ मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

येथे क्लिक करा - नांदेड शहराच्या विकासासाठी 100 कोटीचे विशेष अनुदान

युरियाचा दोन हजार टन बफर स्टॉक

जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकरी पिकांना दुसर्‍या टप्यात युरिया खताचा वापर करतात. यासाठी कृषी विभागाने दोन हजार टन युरियाचा बफर स्टॉक करून ठेवला आह याव्यतिरिक्तही १४ हजार ८६३ शिल्लक असल्यामुळे जिल्ह्यात युरियाची टंचाई नसल्याचे विभागाकडून कळविण्यात आले. आगामी काळात आवश्यकतेनुसार बफर स्टॉकमधून जिल्ह्यातील तालुक्यांना वितरित करण्यात येईल अशी माहिती रविशंकर चलवदे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com