Nanded Accident: नांदेड जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये; जणांचा मृत्यू झाला
Accident News: नांदेड जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. मुखेड-नरसी रोडवरील कार आणि दुचाकीच्या धडकेत राजेश निरदुडे यांचा मृत्यू झाला, तर अर्धापूर-वारंगा रस्त्यावर ट्रकच्या धडकेत शंकर खांडरे यांचा मृत्यू झाला.
नायगाव : मुखेड-नरसी रोडवर होटाळ्याजवळ गुरुवारी रात्री साडेसातला कार व दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीस्वार राजेश सुरेश निरदुडे (वय ३२,रा.मुखेड) यांचा मृत्यू झाला. तर रवी चंद्रकांत निरदुडे (२०) गंभीर जखमी झाले.