Nanded News: गावठी पिस्टलसह दोघे अटकेत; दुसऱ्या कारवाईत तीन दुचाकी जप्त
Nanded Crime: नांदेडमध्ये दोन तरुणांना गावठी पिस्टल व चोरीच्या दुचाकींसह अटक करण्यात आली. एकूण १.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
नांदेड : शहरात दुचाकी चोरी व अवैध शस्त्र साठवणूकप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोन तरुणांना अटक करत गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि तीन चोरीच्या दुचाकी असा एकूण एक लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.