कोरोनाच्या भीतीपोटी निघाले, काका पुतण्याला काळाने गाठले

विनोद आपटे
शनिवार, 16 मे 2020

पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथील महामार्गावर कारचे टायर फुटून मोठा अपघात झाला असून या अपघाता मध्ये काका व पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी (ता.१५) रोजी घडली.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील रहिवासी असलेले व मुंबई येथील एका खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले बालाजी शंकरराव पोन्नमवार हे आपल्या शिक्षक असलेल्या लहान भावासह कुटुंबाला घेऊन आपल्या (एम. एच.०२ ए.वाय. ४८८७) कारने एका मागे एक गावाकडे निघाले होते.

मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड)ः कोरोनाने मुंबई महानगराला कवेत घेतले असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे व राज्य सरकारने आपआपल्या गावाकडे जाण्यासाठी मुभा दिल्यामुळे आपल्या कुटुंबाना घेऊन गावाकडे येत असताना पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथील महामार्गावर कारचे टायर फुटून मोठा अपघात झाला असून या अपघाता मध्ये काका व पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी (ता.१५) रोजी घडली. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील रहिवासी असलेले व मुंबई येथील एका खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले बालाजी शंकरराव पोन्नमवार हे आपल्या शिक्षक असलेल्या लहान भावासह कुटुंबाला घेऊन आपल्या (एम. एच.०२ ए.वाय. ४८८७) कारने एका मागे एक गावाकडे निघाले होते.

 

हेही वाचा -  नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह
 

इंदापुर येथे आल्यानंतर अचानक कारचे पुढील टायर फुटल्यामुळे त्याच वेगात गाडी दोन पलटी खाल्यामुळे कारमध्ये असलेले महादू शंकरराव पोन्नमवार (वय ३३) वर्ष व इंशात बालाजी पोन्नमवार (वय नऊ) वर्ष यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे या काका, पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. तर बालाजी पोन्नमवार यांनाही डोक्याला व छातीला जबर मार लागला असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार चालू आहेत. शनिवारी (ता.१६) रोजी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर सकाळी आकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या धास्तीमुळे गावाकडे निघाले पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. एरवी एवढी इंदापुर येथील महामार्गावर वाहनाची रीघ नव्हती तरीपण कारचे टायर फूटून यात काका व पुतण्याचा दुर्देवी मृत्यू झाला. काका व पुतण्याचे एकाच जागेवर अंत्यसंकार करण्यात आले.

अन् काळजाचा ठोका चुकला
मुंबईहून मुले, सुना व नातवंडे येणार आहेत म्हणून आई, वडील मोठ्या आनंदात होते. पण दुपारी एक वाजता ही, दुर्दैवी घटना घडली. गावातील सर्वांना ही घटना कळाल्यामुळे सर्व जण घराकडे येऊन जात असल्यामुळे, हे लोकं घराकडे का येत आहेत हेच कळत नव्हते. मृतदेह गाव कुशावर आल्यानंतर ही दुर्देवी घटना सागितल्यानंतर आई व वडीलांच्या रडण्याचा आक्रोश पाहून काळीज हेलावून टाकणारे होते.

 

मुलाचा मृत्यू अन् पती हॉस्पिटलमध्ये
या अपघातामध्ये दैवाने फारच क्रुर चेष्टा मांडली. अपघातामध्ये खेळण्या बागडण्याच्या वयातच पोटचा गोळा व दीर नियतीने हिरावून नेला. याचे मोठे दुःख उरात होतेच हे कमी की, काय म्हणून पतीलाही जबर मार लागल्यामुळे उपचारासाठी पुणे येथे हालविण्यात आले. या अवस्थेत पतीलाही सोडून जाता येईना अन् मुलाचे अखेरचे तोंडही पहाता येईना या मातेची अशी अवस्था व रडण्याचा आक्रोश पाहून प्रत्येकांचे डोळे पाणावले.

 

सुदैवाने मोठी दुर्घना टळली
गावाकडे येण्यासाठी दोन कारने घेऊन निघाले होते. एका कारमध्ये फक्त तीघेच होते. तर दुसऱ्या कारमध्ये महीला व पुरूष होते. अपघात हे तीनच व्यक्ती असलेल्या कारला झाला म्हणून सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. या कारमध्ये जास्त व्यक्ती असते तर मोठी दुर्घटना घडली असती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle And Nephew Of Mukramabad Died In An Accident At Indapur, Nanded News