esakal | दुर्दैवी घटना : दारात मांडव, नवरदेव दुचाकी अपघातात ठार; उद्या मंगळवारी होते लग्न

बोलून बातमी शोधा

अपघातात नवरदेव ठार
दुर्दैवी घटना : दारात मांडव, नवरदेव दुचाकी अपघातात ठार; उद्या मंगळवारी होते लग्न
sakal_logo
By
प्रकाश जैन

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : तोंडावर लग्न सोहळा असतांना हिमायतनगर शहरात खरेदीसाठी येवुन गावाकडे परतणाऱ्या नवरदेवाचा खडकी फाट्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २४ ) खडकी फाटा येथे दुपारी १२ वाजता घडली. या अपघात अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.

वाळकेवाडी येथील राजु शेषराव वाळके (वय २२ ) ह्या तरुणाचा मंगळवारी (ता. २७) रोजी विवाह होणार होता. लग्नानिमित्त काही किरकोळ सामान घेण्यासाठी हिमायतनगर येथे दुचाकी (एम.एच. २६ बि.के.३३९२) येथे येवुन परत जातांना प्रवासात खडकी फाट्यावर विनानंबरच्या दुचाकीला पाठी मागुन धडकून तो गंभीर जखमी झाला.

हेही वाचा - चांगली बातमी : नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्न बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के; मृत्यूचेही प्रमाण घटले

हा अपघात इतका भयंकर होता की राजु वाळके ह्या तरुणाचा सिमेंट रस्त्यावर पडुन अतिरक्त स्रावाने जागीच मृत्यू झाला. तर नंबर नसलेल्या दुचाकीवरील श्रीगणेश कलाले ( वय २४ ), विनोद वांगे (वय २०) रा. खडकी बाजार दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

राजु वाळके याचा लग्नापुर्वी दोन दिवसाआधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे