esakal | दुर्दैवी घटना : लग्नाच्या चिंतेने तरुणीने घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जुने गाव नरसी (ता.नायगाव) येथील रहिवासी पूजा वसंत माळगे (वय २२) तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.

दुर्दैवी घटना : लग्नाच्या चिंतेने तरुणीने घेतला गळफास

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : घरची परिस्थिती हलाखीची असल्याने माझे लग्न कसे होणार या नैराशेतून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एक डिसेंबर रोजी सायंकाळी नायगाव तालुक्यातील जुने गाव नरसी येथे घडली. याबाबत रामतिर्थ पोसिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

जुने गाव नरसी (ता.नायगाव) येथील रहिवासी पूजा वसंत माळगे (वय २२) तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. आईची परिस्थिती गरिबीची असल्याने माझे लग्न कसे होणार या चिंतेत पूजाने एक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने केलेल्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी शकुंतला माळगे यांच्या माहितीवरुन रामतीर्थ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा नांदेड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन -

अन्य दोन घटनांत दोन आत्महत्या

जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलिसांनी या घटनेची नोंद घेतले आहे. मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथील सोपान उर्फ अभिलाष अशोक बट्टेवाड (वय १८) या तरुणाने एक डिसेंबर रोजी सकाळी नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरात असलेल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

तर दुसर्‍या घटनेत कंधार तालुक्यातील हिप्परगा येथील माधव धोंडीराम कदम (वय २८) या तरुणाने विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्यास विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंधार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
 

loading image