एक अनोळखी लिंक करू शकते आपला खिसा रिकामा, कशी ते वाचा...

image
image

नांदेड ः अतिवापरामुळे सोशल मीडिया हे माध्यम मूलभूत गरज बनत चालली आहे. परंतु, आपल्याला माहित आहे का? हीच शौकेची मूलभूत गरज आपल्यासाठी तितकीच घातक ठरू शकते. फेक अकाउंटवरून फसगत झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यात व्यक्तिगत माहिती आणि बॅंक बॅलेन्सचे डिटेल्स एखाद्याच्या हातात जाऊन आपण कंगालही होऊ शकतो. कुठलिही बॅँक अथवा फायनान्स कंपन्या काही तरी तारण ठेवूनच कर्ज देतात. मात्र, सोशल मीडियावर सध्या केवळ कागदपत्रांच्या आधारावर कर्ज देण्याचे आमिष दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू सहज या मायाजाळात अडकून आपली सर्व काही माहिती त्यांना देतो आणि इथेच फसवणूक होते. 

सध्या तरुणाईसह प्रत्येकाच्या हाती ॲंड्रॉईड मोबाइल आला आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर व्यक्त होतो. कोणी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतो. याचा फायदा जाहिराती करणाऱ्या कंपन्यांनी घेतला आहे. त्यातील काही जाहिराती खऱ्याही असतील, पण इतर अनेक जाहिराती त्यांना हव्या असलेल्या ग्राहकांच्या शोधासाठी सतत भडीमार केल्या जातात. त्यामध्ये त्वरित कर्ज, मोबाइलवर कर्ज, आधार आणि पॅन नंबर द्या, लगेच एका मिनिटात कर्ज मिळेल, अशी जाहिरात दिसून येते. त्यावर दिलेल्या सुचनेप्रमाणे फक्त एक क्लिक करा तुम्हाला बॅँक खात्यात काही कालावधीसाठी ठराविक पैसे देण्याचा फंडा अनेक कंपन्या राबवित आहेत. अशा जाहिराती धोक्याच्या ठरू शकतात. कारण त्यामुळे खातरजमा केल्याशिवाय कुठल्याही लिंकला तुमच्या मोबाइलमधील सर्व गोपनीय माहिती देऊ नका.   

अशी होते फसगत 
सोशल मीडियावर सुरू असलेल्या जाहिरातींवर क्लिक केल्यास त्या कंपनीचे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड किंवा इन्स्टॉल करावे लागते. यानंतर ते ॲप इन्स्टॉल करताना संबंधित कंपनी ‘ॲलो ॲक्सेस टू इन्टॉल ॲप’ असे विचारते. त्यावेळी तुमच्या मोबाइलमधील कॉन्टॅक्ट्स, व्हॉट्सॲप, जी-मेल, फेसबुकद्वारे तुम्हाला लॉगिन करण्यास सांगितले जाते. या सर्व बाबीला ॲलो म्हणल्याशिवाय ॲप इन्स्टॉल होत नाही. मग हे सर्व करताना आपल्या मोबाइलवरील सर्व खासगी माहिती सदरील कंपनी ॲक्सेस करते. यानंतर आधार नंबर, पॅन नंबर आणि इतर व्यक्तिगत माहिती टाकल्यावर तुम्ही किती रुपयांच्या कर्जाला पात्र आहात, ते कंपनी ठरविते आणि तुम्हाला तुम्ही दिलेल्या बॅंक खात्यावर कर्ज कधी मंजूर होते किंवा नाही. पण यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी ॲप अनइन्स्टॉल जरी केले, तरी तुमची खासगी माहिती जी शेअर झाली ती काही तुम्ही पुन्हा मिळवू शकत नाही, असा धोका होऊ शकतो. म्हणून वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.  
  
पैसेही मिळतात, पण...
या ॲपद्वारे अनेकांनी पैसे पण मिळविले आहेत. पण, हे पैसे फक्त दहा ते पंधरा दिवसांत परत करावे लागतात. यासाठी व्याज आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मिळणाऱ्या रकमेच्या जवळपास वीस टक्के रक्कम कपात करून पैसे मिळतात. त्यानंतर परत करताना दिलेल्या कालावधीपेक्षा एकही दिवस उशीर झाल्यास त्याला पुन्हा जवळपास दहा टक्के अतिरिक्त रकमेची भर टाकल्या जाते. जर त्यापेक्षाही उशीर झाल्यास आपल्या मोबाइलमध्ये नातलगांच्या नावे असलेल्या नंबरवर (जसे अत्या, मामा, भाऊ, काका अशा नावाने सेव्ह असलेले नंबर) फोन लावून सदर पैसे भरण्याची मागणी त्यांच्याकडे केली जाते, ज्याचा त्यांना पुसटशी कल्पनाही नसते.अन 
 
हेही वाचा -  परभणीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

ओटीपी मिळवून होऊ शकतो गैरफायदा 
सध्या प्रत्येकाच्या आधारला किंवा बॅँकेला आपण वापरत असलेला मोबाइल नंबर रजिस्टर्ड केलेला असतो. त्यावर आपल्याला बॅँकेतील शिल्लक, काढलेली रक्कम यासह विविध शासकीय कामांशी निगडित असलेल्या घटकांची माहिती मिळत असते. हाच मोबाइल नंबर जर किरकोळ कर्ज किंवा एखाद्या ॲपला इन्स्टॉल करताना आपण दिला, तर त्याचे ॲक्सेस मिळवून येणाऱ्या ओटीपीचा गैरवापर सुद्धा केला जाऊ शकतो. तुमच्या हातात असलेल्या मोबाइलवर तो ओटीपी आला किंवा तुम्ही काही फोटो शेअर केल्या तरी त्या एका क्लिकमुळे तुम्ही ॲक्सेस गमावून बसू शकता. मग रक्कम लंपास होणे किंवा इतर खासगी गोपनीय माहिती सर्वांपर्यंत लिक होण्याचे प्रकार घडतात.

तरुणाईने बाळगावी सावधानता 
महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी, नुकतेच नोकरीला लागलेले किंवा बेरोजगार असलेले यांना याचा धोका होऊ शकतो. याचे कारणही असे की, तरुणाईला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हाती पैसा खेळता असावा असे वाटते. यात शिक्षणाचा, बाहेरगावी राहण्याचा, मेसचा किंवा भाड्याचा पैसा देण्यासाठी तसेच नवनवीन मोबाइलची खरेदी असो, की विविध वस्तू, कपडे यासाठी घरच्यांना पैसे मागेपर्यंत अशा पद्धतीने पैसे कर्जरूपी मिळत असेल तर ते घेण्याची इच्छा व्यक्त होते. यात फसगत होईल याचा अंदाजही अनेकांना नसतो. मग त्यातून फसवणूक झाल्याचे प्रकार घडतात. 

हे करू नका 
फेक ॲप इन्स्टॉल करू नका 
ॲप इन्स्टॉल करताना डिने करा, ॲलो करू नका. 
आधार, पॅन कार्ड, मोबाइल नंबर देऊ नका. 
बिनकामाचे ॲप मोबाईलमध्ये ठेऊ नका.
खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही प्रश्‍नाची उत्तरे देऊ नका.  

माहिती शेअर करू नये 
वैयक्तिक माहिती कुठल्याही ॲप किंवा लिंकवर जाऊन भरू नका. कर्ज घेण्यासाठी बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा थेट बॅँकेत जाऊन कर्ज विभागाशी संपर्क साधावा. मोबाइलवर अशा प्रकारे कुठल्याही फसवणूक होणाऱ्या जाहिरातींशी खातरजमा झाल्याशिवाय माहिती शेअर करू नये.  
- आवेज मखसूद अहमद काझी, पोलिस उपनिरीक्षक, लातूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com