नांदेडच्या कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनाविना केले कार्यमुक्त

स्वतःच्या जीवाचा विचार न करता दिवसरात्र एक करुन जिल्ह्यातील कोविड रुग्ण कमी करण्यासाठी स्टापला प्रशासनाने कामापुरता उपयोग करुन सोडून देने हे कितपर्यंत योग्य आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Updated on

नांदेड : कोविड सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना मार्चपासून पगार न देताच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्टाप नर्स व इतर कोविड कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. तीन महिन्यापासून पगार न देता कार्यमुक्त करणे हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याने या निर्णयाचा निषेध करत चक्क कर्मचाऱ्यांनी भारताच्या लोकशाहीवादी युवा महासघांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

स्वतःच्या जीवाचा विचार न करता दिवसरात्र एक करुन जिल्ह्यातील कोविड रुग्ण कमी करण्यासाठी स्टापला प्रशासनाने कामापुरता उपयोग करुन सोडून देने हे कितपर्यंत योग्य आहे. शासनाने या कोविड यौध्यांचा नक्की विचार करावा आणि न्याय द्यावा. अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ - पडळकर -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावा त्यासाठी कोरोना योद्धे विविध विभागातून जिवाचे रान करत होते. त्यात सर्वात पुढे फ्रंट लाईनवर लढणारा योद्धा म्हणून आरोग्य विभागाचे कर्मचारी. मात्र याच योद्ध्यांना मागील मार्च महिन्यापासून मानधन मिळाले नाही. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना तात्काळ मानधन देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

शासकीय जिल्हा रुग्णालय आणि विष्णुपुरी येथील रुग्णालयात कर्तव्यावर असलेले आरोग्य कर्मचारी ज्यात स्टाफ नर्स व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी कोविड सेंटरमध्ये मागील एक वर्षापासून सतत रुग्णांची सेवा केली. परंतु त्याच कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब गंभीर असून संबंधित यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यापासून घर भाडे, लाईट बिल, ऑटो भाडे, पेट्रोल इतर घरगुती खर्च करण्यासाठी त्यांना खासगी लोकांकडून कर्ज काढून आपला संसार चालवावा लागत आहे. आर्थिक परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागत आहे.

येथे क्लिक करा - ओबीसींना मिळणारे अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात

मार्च महिन्यापासून थकलेला त्यांचा पगार रुग्णालय प्रशासनाकडून काढण्यात येत नसल्याने त्यांनी अखेर बंडाचे शस्त्र उगारले आहे. चक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अंकुश माचेवाड यांच्या नेतृत्वाखाली काही कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी स्वप्नजा जोंधळे, आरती वाघमारे, दृपदा पंदलवाड, संगीता बंदलवाड, माधवी कांबळे, निकिता बोगेवाड, सतीश वाघमारे यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वाक्षऱ्या सह निवेदन दिलेले आहे. यावर जिल्हाधिकारी हे लवकरच निर्णय घेतील व या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com