

Nanded News
esakal
नांदेड: निसर्गाच्या अवकाळी कोपाने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अक्षरशः तोंडचा घास हिरावून घेतला आहे. १६ ते २० मार्चदरम्यान झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने तब्बल २८०.४५ हेक्टरवरील पिके व फळबागा जमीनदोस्त झाल्या असून, ४४८ शेतकरी थेट बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालाने या नुकसानीची भीषणता अधोरेखित केली आहे.