Nanded News : ‘अवकाळी’ने वाढवल्या आरोग्याच्या समस्या; लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी महत्त्वाच्या सूचना

लहान मुलांसह ज्येष्ठांनाही होतोय त्रास; आरोग्यावर विपरीत परिणाम
unseasonal rain health effects precautions for children and elders winter doctor
unseasonal rain health effects precautions for children and elders winter doctorSakal

Nanded News : थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस बरसला. तसेच तामिळनाडूत आलेल्या मिचॉँग वादळामुळे हवामान अन् वातावरण बदलाचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे. आता थंडीतही याच परिस्थितीचा सामना नांदेडकर करत आहेत.

अशा अवकाळी पावसामुळे बदललेल्या वातावरणात रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यापासून तर त्वचेच्या आजारांसह अॅलर्जी आणि श्वसनविकार, दमा, फुफ्फुसाच्या समस्या, मानसिक विकार वाढण्याची जोखीम आहे.

हवेतील गारवा असलेले वातावरण संसर्ग रोग पसरविणारे विषाणू वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हवेत गारवा आल्याने झालेला बदल लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक आहे. मुलांसह ज्येष्ठांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

unseasonal rain health effects precautions for children and elders winter doctor
Nanded News : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

विशेषतः श्वसनमार्गासह संसर्ग आजार व दमाग्रस्तांना त्रास जाणवतो. कीटकांचे संक्रमण आणि जलजन्य रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे दमासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्येष्ठांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांना लक्षात घेत आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे.

पिके आली संकटात

प्रदूषणाचा एक्यूआयही वाढत आहे. ज्यामुळे आरोग्याची समस्या उद्धभवू शकण्याची शक्यता आहे. दमा आणि संधिवात असलेल्या वृद्धांना या वातावरणाचा अधिक त्रास जाणवू शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या हवामान बदलाचा फटका फळ व भाजीपाल्याला बसणार असून सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिके संकटात आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

unseasonal rain health effects precautions for children and elders winter doctor
Nanded Crime News : दोन शाळकरी मुलांचे नांदेडमधून अपहरण

अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास दमाग्रस्त लोकांनी औषधी सोबत ठेवावी. अचानक आलेल्या पावसामुळे श्वसनासंबंधीच्या आजारांमध्ये वाढ होऊ शकते. अस्थमा, ब्राॅन्कायटिस आजारदेखील वाढण्याची शक्यता असते.

- डॉ. संजीवनी कुलकर्णी

अचानक बरसलेला पाऊस लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. ताप, खोकला, सर्दीची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. श्वसनाचे आजार वाढत आहे. तसेच गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत आहे.

- डॉ. अमोल देशमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com