संसाधने, मनुष्यबळाच्या वापरानेच ‘स्वारातीम’ यशोशिखरावर

nnd01sgp07.jpg
nnd01sgp07.jpg


नवीन नांदेड ः ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या विद्यापीठातील कार्यकाळास नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमिताने दोन वर्षाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात ‘सकाळ’ने घेतलेला आढावा. 


‘स्वछ विद्यापीठ हरित विद्यापीठ’ 
स्वारातीम ‘आरटीपीसीआर’वर आधारित कोव्हीड-१९ नमुना चाचणी करणारे राज्यातील पहिले व देशातील दुसरे विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठ परिसरामध्ये ‘स्वछ विद्यापीठ हरित विद्यापीठ’ या संकल्पनेची सुरवातही करण्यात आली. भौतिकशास्त्र संकुलामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचा विकास करण्यात आला आहे. प्रशासकीय, शैक्षणिक व सह-अभ्यासक्रम व आवांतर अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा व गतिमानता येण्याकरीता माहिती व तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधांचा विकास व ‘आयुएमएस’ पध्दतीचा अवलंबही विद्यापीठात करण्यात आला. 

नियोजित कालावधीत उपयोगीता प्रमाणपत्र 
स्वारातीम विद्यापीठात एनपीटीएल, स्वयंम, मुक या व्यासपीठावर आधारित ऑनलाईन कोर्सेसकरीता विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यात आले. परिणामी आयआयटी मद्रास, एनपीटीएल यांचेकडून ‘Active local chapter’ हा पुरस्कार प्राप्त करून देण्यात आला आहे. तसेच ई-टपाल अंमलबजावणी, ऑनलाईन खरेदी आणि पेमेन्ट‍ गेट वे करीता जेम पोर्टलच्या वापराकरीता विविध संस्थाकडून शैक्षणिक आणि संशोधनाकरीता प्राप्त निधीचा प्रभावीपणे आणि नियोजित कालावधीत वापर करून वेळेत उपयोगीता प्रमाणपत्र सादर करण्यात आले. 
विद्यापीठ परिसर व उपपरिसरात भौतिक आणि पायाभूत सुविधांकरीता शैक्षणिक, विस्तार आणि संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थासोबत संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला. 


कोव्हीड-१९ तपासणी प्रयोगशाळा
कोव्हीड-१९ या संसर्गजन्य आजारामध्ये टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन अध्यापन व अध्ययनासाठी देशभरातील १७,००० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यापीठातील कोव्हीड-१९ नमुना तपासणी प्रयोगशाळेत मराठवाडा विभागातील कोव्हीड-१९चे रूग्ण वाढत असताना तसेच संशयीत रूग्नांचे नमुने पुणे व औरंगाबाद येथे पाठविण्यात अडचणी येत होत्या. या नंतर विद्यापीठातील उपलब्ध संसाधने व मनुष्यबळाचा वापर करून विक्रमी वेळेत कोव्हीड-१९ नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या काळात प्रयोगशाळेत सुमारे ४०,००० नमुना तपासणी करण्यात आली असून नमुना तपासणी प्रयोगशाळेची क्षमता दर दिवसाला ५०० इतकी आहे. 

महाविद्यालयांचे सक्षमीकरण 
गेल्या दोन वर्षात विद्यापीठ उपपरिसर व संलग्नित महाविद्यालयांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. तसेच उपपरिसर येथे पदवी आणि पदव्युत्तकर स्तरावरील व्यावसायीक आणि कौशल्या‍वर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून उपपरिसर येथे भौतिक व पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना प्रकल्पाकरीता अधिक अर्थ सहाय्य देण्यासाठी लघू संशोधन प्रकल्पल योजना सुरू केली आहे. 

‘लिगो इंडीया’ विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
विद्यापीठाअंतर्गत किनवट व हिंगोली येथे बहुउद्देशीय केंद्र स्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून अनेक विद्यापीठांसोबत सामजंस्य करार देखील करण्यात आला आहे. आयुका, पुणे आणि इंस्त्रो, बंलगुरू यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत व गुरुत्वाकर्शणाच्या लहरी शोध (लिगो) वेधशाळेच्या स्थापनेचे औचित्त्य साधून ‘लिगो इंडीया’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात रेस्को मॉडेल योजनेंतर्गत विद्यापीठात ५००, उपपरिसर ५०, न्युप मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली ५०, किनवट १० केडब्यू व पी क्षमतेचे प्रकल्प स्थापित करण्याकरीता पत्रव्यवहार सुरू आहे. 

सर्वात तरुण विद्यापीठ म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अशी ओळख असलेल्या विद्यापीठात कुलगुरू म्हणून मी (ता.पाच) नोव्हेंबर २०१८ रोजी पदभार स्वीकारला. दरम्यानच्या काळात माझ्या परीने प्रशासकीय कामात गतिमानता आणण्याच्या हेतुने विद्यार्थी व पालक यांना कमी वेळेत व सहज सेवा मिळावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यापीठात वृक्ष लागवडही करण्यात आली. कोरोना काळात विद्यापीठाने उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर विद्यापीठात ‘इंक्युबेशन’ केंद्रामध्ये कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू केली. विद्यापीठाचे सामाजिक दायित्व समोर ठेवून काहीतरी केले पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या सर्व टीमने अहोरात्र परिश्रम करून याची उभारणी केली होती. यासाठी विद्यापीठास पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे सहकार्य लाभले. 
- डॉ. उद्धव भोसले, कुलगुरू.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com