Nanded News: धुळीच्या त्रासामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात; वडगाव-बिहारीपूर मार्ग अपूर्ण
Incomplete Road Work Endangers Travelers: वडगाव ते बिहारीपूर राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण कामामुळे उडणारी धूळ प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. चार ते पाच किलोमीटरचा कच्चा रस्ता विशेषत: दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरला आहे.
बाऱ्हाळी: राष्ट्रीय महामार्ग १६१ (अ) वरील वडगाव ते बिहारीपूरदरम्यान रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, या मार्गावरून सुसाट धावणाऱ्या हायवा वाहनांमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.