

Nanded News
esakal
वाशी: तालुक्यासह शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने संतापाची लाट उसळली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज खंडित होत असल्याने वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांकडून तीव्र टीका होत आहे.