Video- कोरोना संकटात नागरिकांनी काळजी घ्यावी- डॉ. हंसराज वैद्य

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 28 मे 2020

आर्सेनिक अल्बम- 30 या होमिपॅथिक औषधाचे सेवन करावे असे आवाहन डॉ. हंसराज वैद्य यांनी केले आहे.

नांदेड : कोरोनाच्या संकट काळात (कोव्हिड-19) जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतः चे व आप्तस्वकीयांची काळजी घेवून आर्सेनिक अल्बम- 30 या होमिपॅथिक औषधाचे सेवन करावे असे आवाहन डॉ. हंसराज वैद्य यांनी केले आहे.

थांबा, थंड डोक्याने विचार करा आणि चला. केंद्र व राज्य शासनाच्या आणि प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत्त पालन करा. संक्रमणात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. स्वतः ची व आप्त स्वकियांची काळजी घ्या. अत्यावश्यक किंवा टाळता न येण्याजोग्या कारणाशिवाय घराबाहेर निघू नका. नाका- तोंडावर, डोक्यावर उपरणे, गमच्या, मोठ्या कपड्याने झाकून घ्या, साधा (नंबरचा/नंबर नसेल तर साधा) चष्मा घाला अन् मगच घराबाहेर पडा. सामाजिक अंतर एक मिटर किंवा सहा फूटाचे अंतर ठेऊनच व्यवहार करावा. साबन, पाणी, सॅनेटायझर वापरून कोपरापर्यंत हात व गुडघ्यापर्यंत पाय धुवूनच घरातील वस्तू वापराव्यात. 

रोग प्रतिकार शक्ती वाढवा

दहा वर्षा खालील व साठ वर्षावरील व्यक्तींनी, गरोदर तथा स्तनदा माता आणि आजारी व्यक्तीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनीं घरातच राहवे. गर्दी करू नये, गर्दीच्या जागी जाऊ नये. सर्वांनीच प्रवास शक्यतो टाळावाच. सहन होईल एवढा नियमित व्यायाम, प्राणायाम, योगाभ्यास, ध्यान धारना, योग निद्राभ्यास, शरिराची कोरडी मॉलिश करावी. रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ताजा, संंतुलित, पुरेसा, शाकाहार, फळे, उकळुन- गाळून- थंड झालेले साधे- भरपूर पाणी, पुरेशी पूर्ण विश्रांती. 

हेही वाचा - लॉकडाउनमध्ये फासली नात्यांना काळीमा, घरातच...

शासनाच्या सुचनांचे पालन करा 

विरंगुळा, सुरेल संगीत, आवडी प्रमाणे साहित्य वाचन, मनन, चिंतन, लेखन, मित्र- मैत्रिणींशी गप्पा, गायन करत रहावे त्याच बरोबर आर्सेनिक अल्बम- 30 या होमिपॅथिक औषधाची केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे रोज सकाळी उपाशी पोटी चार गोळ्या चोखाव्यात व पथ्य करावे. पथ्य- 90 दिवस चहा, कॉफी, कांदा, लसूण, आद्रक, कोथींबिर, कडीपत्ता, पुदिना, हिंग, गुटका, बिडी, तंबाखू , दारू, अतर, स्प्रे तथा कोणतेही उग्र वास येणारे पदार्थ टाळणे आवश्यक आहे, अन्यथा होमिपॅथिक औषधाचा उपयोग होणार नाही. परिस्थिती अवाक्या बाहेर जाऊ नये म्हणून घरीच राहण्याचे आवाहन डॉ. हंसराज वैद्य यांनी केले असून अधिक माहितीसाठी 9423138385 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video- Citizens should be careful in Corona crisis Dr. Hansraj Vaidya nanded news