Video - पीजीच्या विद्यार्थ्यांनी कशी केली आयुष काढ्याची निर्मिती? तुम्ही वाचाच

शिवचरण वावळे
Saturday, 11 July 2020

नांदेड : दोन वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात पदयुत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चक्क वर्गणी करुन कोविड - १९ च्या रुग्णांसाठी आयुष काढा तयार करण्यासाठी नुसताच पुढाकार घेतला नाही; तर विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावर आठ दिवसांकरीता आयुष काढा तयार करुन तो पंजाब भवन व यात्रीनिवास येथील रुग्णांना त्याचे मोफत वाटप करण्याची संकल्पना अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी सकारात्मक विचार करुन विद्यार्थ्यांना लागणारी जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळवून दिली. याशिवाय महाविद्यालयाच्या रसशाळेत आयुष काढा तयार करण्यासाठी परवानगी दिली. 

नांदेड : दोन वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात पदयुत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चक्क वर्गणी करुन कोविड - १९ च्या रुग्णांसाठी आयुष काढा तयार करण्यासाठी नुसताच पुढाकार घेतला नाही; तर विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावर आठ दिवसांकरीता आयुष काढा तयार केला.

तयार केलेला काढा पंजाब भवन व यात्रीनिवास येथील रुग्णांना त्याचे मोफत वाटप करण्याची संकल्पना अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी सकारात्मक विचार करुन विद्यार्थ्यांना लागणारी जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळवून दिली. याशिवाय महाविद्यालयाच्या रसशाळेत आयुष काढा तयार करण्यासाठी परवानगी दिली. 

आरोग्य मंत्र्याची कौतुकाची थाप

विद्यार्थ्यांनी संधीचे सोनं करण्यासाठी व कामात सुसुत्रता यावी म्हणून सकाळ-संध्याकाळ आयुष काढा तयार करणे, तयार काढा रुग्णांपर्यंत पोहचविणे व पोहचविलेल्या काढ्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे तेथील डॉक्टरांमार्फत फिडबॅक घेणे असे आठ दिवस काम सुरु ठेवले. परंतु आठ दिवसाने काहीच होणार नाही. रुग्णांना आयुष काढ्याची मोठी गरज आहे. हे ओळखुन विद्यार्थ्यांनी पुन्हा निधी जमा करण्यास सुरुवात केली आणि आयुष काढ्यासाठी लागणारे आयुर्वेदिक मसाले औषधींची खरेदी केली. मागील पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करणारे प्रशस्तीपत्र पाठविले. 

हेही वाचा- Corona Breaking : नांदेडात दोघांचा मृत्यू, ११ पॉझिटिव्ह -

या विद्यार्थ्यांचा आहे पुढाकार

आरोग्य मंत्र्याकडून मिळालेल्या शाबासकीमुळे विद्यार्थी पुन्हा तितक्याच जोमाने आणि निःस्वार्थ भावनेन पी. जी. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयुर मोरे, डॉ. देवानंद पवार, गणेश हक्के, डॉ. कोमल कमलाकर, डॉ. निकिती देशमुख, डॉ. गोविंद मुळे, डॉ. शिवकुमार मरतुळे, डॉ. गणेश पवार, डॉ. सुमया सिंघ, डॉ. अक्षय मोरे, डॉ. एश्वर्या भोसले, डॉ. मयुरी सुर्यवंशी, डॉ. शुभांगी मराठे, डॉ. भाग्यश्री नरवाडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यात स्वतःला झोकुन देऊन कोरोना योद्धा म्हणून कामाला लागले आहेत.

 हेही वाचले पाहिजे- राज्यात प्रथमच : नांदेडात आता ‘मिशन पॉझिटिव्ह सोच’

दिवसातून दोन वेळा काढ्याचा पुरवठा

यासाठी त्यांना अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांची भक्कम साथ लाभली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आयुष काढ्याचा रुग्णांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने पुढील काळात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने आयुष काढा तयार करुन तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सकाळ-संध्याकाळ शंभर एमएल असा दिवसातून दोन वेळा हा काढा पुरविण्यात येणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - How Did PG Students Create AYUSH Kadhya You Read Nanded News