

Vishnupuri Dam
esakal
रामेश्वर चंद्रकलाबाई बालाजीराव काकडे
नांदेड : शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या विष्णुपुरी येथील कै. शंकरराव चव्हाण प्रकल्पातील व्हर्टिकल गेटच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी २५ कोटींहून अधिक रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या गेटच्या रोलरची पुन्हा निर्मिती, उभारणी आणि दुरुस्तीसाठी तब्बल ९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.