esakal | विष्णुपूरी प्रकल्प पहिल्याच पावसात तुडूंब- गोदावरीकाठच्या गावांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला

विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला- गोदाकाठच्या गावांना इशारा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला विष्णुपूरी उपसा जलसिंचन प्रकल्प पहिल्याच पावसात तुडूंब भरला आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर नांदेड शहराची तहान भागल्या जाते. तसेच दक्षिण नांदेड भागातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडवणारा हा प्रकल्प जूनमध्ये भरल्याने रविवारी (ता. १३) जून रोजी रात्री एक दरवाजा उघडला आहे.

नांदेड विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात पाऊस पडत असल्याने मर्ग नक्षत्राच्या अगोदरपासून पाऊस पडत असल्याने विष्णुपुरी प्रकल्प 100 टक्के भरला होता. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातून तारीख १३ जून मध्यरात्री रात्री एक वाजता विष्णुपुरी प्रकल्पाचा एक गेट नंबर सात या गेटमधून रात्री एक वाजता 471 पाण्याचा विसर्ग करण्यात आला. लेवल 355 झाले होते. पूर्णा परिसरात रात्रीला पाऊस पडल्याने विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती यामुळे विष्णुपुरी प्रकल्प 100 टक्के भरला विष्णुपुरीच्या एक गेटमधून सकाळी नऊ वाजेपर्यंत 410 पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात केला जात असल्याची माहिती विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली आहे.

धरणाच्या वरच्या भागात पाऊस उघडल्यास विष्णुपुरी प्रकल्पाचे दुपारपर्यंत गेट बंद करण्यात येईल नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा व शेतीला पाणी जीवनदान देणारा विष्णुपुरी प्रकल्प चार वर्षानंतर प्रथमच जून महिन्यात शंभर टक्के भरून विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.

विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून चांगला पाऊस सुरु आहे. परभणी जिल्ह्यात पाऊस होत आहे. पूर्णा नदीचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. विष्णुपूरी प्रकल्प सध्या स्थिती ८८ टक्के भरले आहे. प्रकल्पात पाण्याची आवक सुरु असल्याने प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येणार आहेत.

हेही वाचा - नांदेड रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागरुकता दिवस

प्रकल्पातील पाणी गोदावरीत सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या खालील बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना आपल्या मालमत्तेची पशुधनाची हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच वेळी नदीपात्र परिसरात असलेल्या वीटभट्टी साहित्य व इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी नांदेड, मुदखेड, उमरी, नायगाव व लोहा तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे नांदेड शहराची तहान भागविली जाते. हा प्रकल्प कधी भरणार याकडे नांदेडकरांचे लक्ष असते. मात्र हा प्रकल्प पहिल्यांदाच जून मध्ये भरल्याने नांदेडकरांमधून समाधानाचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने जुलै महिन्यात प्रकल्प भरला होता.

loading image
go to top