
गावाची निवडणूक म्हटलं की चुरस आली, प्रतिष्ठा आली, काळ, वेळ महत्वाचा असतो. नंतर काही करुन काही फायदा नसतो. विजयासाठी वाट्टेल ते केले जाते.
नांदेड : निवडणुकीत काळ, काम, वेग ( टाईम) महत्वाचा असतो. " जो जिता वही सिकंदर " ठरतात. एका- एका मताचे महत्व किती असते. याचा हा अनुभव. एक- दोन मतांनी पराभूत झाल्यानं आला आहे. पाच वर्षे हे शल्य टोचत. पण आंबेसांगावी (ता. लोहा) मध्ये विमानाने आलेल्या मतदाराने '' विक्रम "' केला.
गावाची निवडणूक म्हटलं की चुरस आली, प्रतिष्ठा आली, काळ, वेळ महत्वाचा असतो. नंतर काही करुन काही फायदा नसतो. विजयासाठी वाट्टेल ते केले जाते. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तीन मतदार थेट विमानाने आले अन गुलाल लावून गेले.
लोहा तालुक्यात सर्वच ठिकाणी अतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या निवडणूका झाल्या त्याला. आंबेसागवी (ता. लोहा ) हे गावही अपवाद ठरले नाही. येथे ही प्रतिष्ठा डावावर होती. आडनावावर होती. झाली...यावेळीही निवडणुकीत घराचा, कुटुंबाचा वारसा प्रचार काळात सांगण्यात आला. तर काही ठिकाणी प्रस्थापितांना सामान्य कार्यकर्त्याने धोबीपछाड दिले.
आंबेसागवी ( ता. लोहा ) येथील निवेदक विक्रम कदम यांनी राजकारणात एन्ट्री केली. गणपतराव कदम व विक्रम या दोघांचे पॅनल होते. त्यांच्याविरुद्ध माजी सरपंच गोविंद सावंत- शिवसेना युवाप्रमुख पद्माकर सावंत यांचे पॅनेल तशी ही निवडणूक. खेडयात- नात्यात आडनावावरच झाली. गटाचे प्रमुख गणपतराव ज्या वार्डात होते तेथे त्यासाठी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून मतदार थेट विमाने आले. त्याच प्रभागात एका जागेवर टॉस झाला आणि गणपतराव विजयी झाले. या निवडणुकीत सेवानिवृत्त शिक्षक विक्रम कदम व गावातील प्रमुख व गणपतराव कदम यांच्या पॅनलचा सहा विरुद्ध एक असा दणदणीत विजय झाला.