गोदावरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा- पाटबंधारे विभाग

प्रल्हाद कांबळे
Sunday, 26 July 2020

त्यामुळे सोडलेले पाणी विष्णुपूरी प्रकल्पात येत असल्याने विष्णूपूरी प्रकल्पातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे  विभागाने दिला आहे. 

नांदेड : गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यात असलेल्या व विष्णुपूरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूला असलेला दिग्रस बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे त्या बंधाऱ्यातून ६८६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सोडलेले पाणी विष्णुपूरी प्रकल्पात येत असल्याने विष्णूपूरी प्रकल्पातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे  विभागाने दिला आहे. 

पालम जिल्हा परभणी येथील दिग्रस बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात विष्णुपूरी प्रकल्पात पाणी सोडण्यात येत आहे. दिग्रस बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात माीगल काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने दिग्रस बंधाऱ्यांवरील लहान बंधारे भरली आहेत. गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीकिणाऱ्यावरील नागरिकांना सतर्क केले आहे. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने दिग्रस बंधारा शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे दिग्रस बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात आल्याने ते पाणी गोदावरी नदीद्वारे विष्णुपूरी प्रकल्पात जमा होत आहे.

हेही वाचा -  धक्कादायक : शेवटसुद्धा चांगला नाही, यांच्या गलथान कारभारामुळे करावा लागला ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार

गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी

याचा परिणाम विष्णुपूरी धरण अगोदरच शंभर टक्के भरल्याने पुन्हा त्यात पाणायाचा येवा वाढत आहे. धरण धोक्याती पातळी ओलांडत असल्याने आजपर्यंत चारवेळा धरणाचे गेट उघडून पाणी सोडण्यात आले आहे. धरणात पाणी जमा होत असल्याने वेळोवेळी धरणाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडत आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.

नांदेडचे विष्णुपूरी प्रकल्प शंभर टक्के भरले 

नांदेडचे विष्णुपूरी प्रकल्प शंभर टक्के भरले असून यासोबतच वरच्या दिशेला असलेल्या जायकवाडी धरणापर्यंत सर्वच बंधारे पूर्ण भरलेले आहे. या ११ बंधाऱ्यांमध्ये एक बंधारा दिग्रस येथे आहे. दिग्रस बंधाऱ्यातील गेट क्रमांक ११ शनिवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता उघडण्यात आले. त्यातून ६८६ क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. हे पाणी १०० टक्के भरलेल्या विष्णुपूरी धरणात येत आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पाचा गेट क्रमांक १४ शनिवारी (ता.२५) सायंकाळी उघडण्यात आला आहे. त्यामुळे शहरातून वाहणारी गोदावरी नदी ज्या ज्या भागातून दृष्टिपथात येते त्या ठिकाणी पाणी वाढल्याचे दिसत     आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning to the villages on the banks of Godavari - Irrigation Department nanded news