esakal | राम मंदीर शिलान्यासासाठी गोदावरीचे जल आणि माती- विहिंप 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यासाठी शनिवारी (ता. २५) संतांच्या उपस्थितीत मृतिका व जलपुजनाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता गोदावरीच्या तिरावर घेण्यात आला. यासाठी विश्व हिंदु परिषदेने पुढाकार घेतला. 

राम मंदीर शिलान्यासासाठी गोदावरीचे जल आणि माती- विहिंप 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : अयोध्या येथील राम मंदीर शिलान्यासासाठी पवित्र गोदावरी नदीतील पाणी आणि माती पाठविण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी (ता. २५) संतांच्या उपस्थितीत मृतिका व जलपुजनाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता गोदावरीच्या तिरावर घेण्यात आला. यासाठी विश्व हिंदु परिषदेने पुढाकार घेतला. 

शनिवारी (ता. २५) जुलै रोजी सकाळी ११ वाजता सचखंड हुजूर साहेब नांदेड येथे गोदावरीच्या पवित्र तिरावर विश्व हिंदु परिषदेतर्फे मृत्तिका पूजन व जलपूजनाचा कार्यक्रम प्रमुख संत महंतांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर राखून नगीना घाट येथे घेण्यात आला. ता. पाच आगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या शिलाण्यासाच्या कार्यक्रमासाठी हे पवित्र जल आणि मृत्तिका पाठविली आहे. 

यांची होती  कार्यक्रमासाठी उपस्थिती

गुरुद्वारा कथाकार श्री सरबजीतसिंग निर्मले, आनंदबन महाराज (दत्तसंस्थान कोलंबी) ह. भ. प. प्राचार्य सु. ग. चव्हाण (अध्यक्ष वारकरी संप्रदाय नांदेड जिल्हा), विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष नविनभाई ठक्कर, विहिंप धर्मप्रसार प्रांतमंत्री कृष्णाजी देशमुख, विहिंप जिल्हा मंत्री शशिकांत पाटील, विहिंप शहर अध्यक्ष डाॅ. रविकुमार चटलावार, विहिंप महिला प्रमुख संजीवनी देशपांडे, सरदार दिलिपसिंग सोढी, दादेश राहटीकर, सनतकुमार महाजन, मधूकरराव कुलकर्णी, राजेश देशमुख (बजरंग दल), गणेश कोकुलवार (विहिंप महानगर मंत्री), अमोल अंबेकर, कैलास बंग, आशिषसिंह चौधरी, गणेश यशवंतकर (बजरंग दल), कृष्णा इंगळे, अक्षय भोयर, सचीन कुल्थे, गणेश ठाकूर, विकास परदेशी, मोहन पाटील, बिरबल यादव, बालाजी घंटे, सतीश देवके, प्रेमानंद शिंदे, गौरव वाळिंबे, अभिजीत वर्मा, संतराम गिते, गणेश बोडखे, मंजुषा देशपांडे, वैष्णवी शर्मा यांच्यासह ह्या कार्यक्रमास विहिंप, बजरंग दल, संघ परिवारातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे पौरोहित्य गजानन गुरु कळगावकर यांनी केले. उपस्थित सर्वाचे हात लावून पैठण व नांदेड येथून २०० मीली जल आणि २०० ग्राम माती टपाल विभागामार्फत पाठविण्यात आल्याची माहिती शशिकांत पाटील यांनी सांगितली.

हेही वाचानांदेड : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्यासाठी विविध विभागात हवाय समन्वय

वडेपूरी येथे दारुसह कार जप्त, एक लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त

सोनखेड : दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर सोनखेड पोलिसांनी कारवाई करत शनिवारी (ता. २५ जुलै) रोजी पहाटे वडेपूरी बसस्थानकावर ३२ हजार ४४८ रुपये किंमतीची देशी दारु व कार असा एकूण एक लाख ३२ हजार ४४८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.


त्या कारमधून दारुची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सोनखेड पोलिसांनी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास कार (एम.एच.२६ ए.एफ.०७०२) थांबवून कारमधील नरेश किरकन व राजू या दोघांची चौकशी करून कारची झडती घेतली. कारमध्ये ३२ हजार ४४८ रुपये किंमतीची देशी दारूचे १३ बॉक्स आढळून आले. यामध्ये पोलिसांनी कारसह एकूण एक लाख ३२ हजार ४४८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हवालदार शिवाजी केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनखेड पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास  पोलिस उपनिरीक्षक चंदन परिहार करीत आहेत.