

Nanded News
esakal
ईस्लापूर: किनवट तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असून, तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ईस्लापूर परिसरातील गोंडेमहागाव, तोटंबा, सावरगाव, मानसिंग नाईक तांडा, इरेगाव, मारलागुंडा आशा १० ग्रामपंचायतींनी विहीर व बोअरवेल अधिग्रहणासाठी किनवट पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत.