सात टॅंकरने पाणी पुरवठा सूरु....कुठे ते वाचा

टॅंकरने पाणी.jpg
टॅंकरने पाणी.jpg

नांदेड ः उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक व किनवट तालुक्यातील एक अशा दोन गावासह मुखेड तालुक्यातील पाच वाड्यांवर एकूण सहा हजार ८२६ नागरिकांना सात शासकीय टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच ५७ गावातील ६८ ठिकाणी खासगी कुपनलिका तसेच विहीरींचे अधिगृहण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षातून देण्यात आली.

१०६ टक्के पर्जन्यमानामुळे टंचाइ कमी
जिल्ह्यात यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी आहे. मागीलवर्षी पावळ्याच्या पाच महिन्यात वार्षीक सरासरीच्या १०६ टक्के झालेल्या पर्जन्यमानामुळे जलस्त्रोत भरले होते. तसेच भूगर्भातील जलसंचय वाढल्याने टंचाईची दाहकता यावर्षी अद्याप जाणवली नाही. परंतु मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून टंचाई जाणवु लागल्याने सात शासकीय टॅंकरणे पाणी पुरवठा सुरु केला आहे. 

सात टॅंकरने पाणी पुरवठा सुरु
जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक व किनवट तालुक्यातील एक अशा दोन गावात टॅंकर सुरु झाले आहे. तर मुखेड तालुक्यातील पाच वाड्यांवर पाच टॅंकरणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण सहा हजार ८२६ नागरिकांना सात शासकीय टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच ५७ गावात टॅंकरसाठी सहा तर टॅंकरव्यतीरिक्त ५१ अशा एकूण ५७ गावातील टॅंकरसाठी सहा तर टॅंकरव्यतीरिक्त ६२ अशा ६८ ठिकाणी खासगी कुपनलिका तसेच विहीरींचे अधिगृहण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षातून देण्यात आली.    

मागीलवर्षी सुरु होते १६१ टॅंकर
मागीलवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे मुखेड, कंधार, लोहा, नांदेड, देगलूर, नायगाव या तालुक्यांसह नांदेड, अर्धापूर व लोहा शहरात टॅंकरणे पाणीपुरवठा करावा लागला होता. यात टंचाइच्या वेगवेगळ्या उपाययोजनावर ३४ कोटींचा खर्च झाला होता. यात ग्रामीण व नागरी भागात एकूण १६१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या अधीक म्हणजेच १०६ टक्यांनुसार एक हजार १३ मिलीमीटर झाल्यामुळे यंदा टंचाइ कमी जाणवत आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने निदर्शने
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मंगळवारी (ता. १९) देशव्यापी निदर्शने करण्याचे आव्हान करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा शाखेने केंद्र सरकारने जाहीर केलेले वीस लाख कोटीचे पॅकेज तात्काळ रद्द करून कामगार, कष्टकरी, शेतकरी, पत्रकार, छायाचित्रकार शेतमजूर, रोजंदारीवरील मजूर, ग्रामपंचायत कर्मचारी, बिडी कामगार, सफाई कामगारांना थेट दहा हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा, कामगार कायद्यातील मालकधार्जिणे बदल तात्काळ रद्द करावेत, कामगारांच्या हिताचे संरक्षण करणारे कडक कायदे अमलात आणावेत, विविध क्षेत्रातील कामगारांना लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळातील वेतन अदा करावे या व इतर मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. 

निदर्शनात अनेकांचा समावेश
निदर्शनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हासचिव ॲड. कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. के. के.जामकर, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ. श्याम सोनकांबळे कॉ. गौतम सूर्य, कॉ. जब्बार खान, कॉ. गणेश संदुपटला, कॉ.गुरू, कॉ. पद्मा तुम्हा आदी सहभागी झाले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com