Video - वझरा शेख फरीद धबधबा पर्यटकांविनाच कोसळतोय, कुठे ते वाचाच

बालाजी कोंडे
Friday, 21 August 2020

माहूर तालुका म्हटलं की, पावसाळ्यात हिरवागार निसर्गरम्य परिसर. आई रेणुका मातेचे मंदिर, गोंड राजांनी बांधलेली रामगड किल्ला परिसर, प्रभू दत्तात्रयाचे निद्रास्थान परिसर, घनदाट हिरवेगार जंगल डोळ्यांचे पारणे फेडतो.

माहूर (जि.नांदेड) : माहूर शहरापासून १२ किलोमिटर अंतरावर डोंगरदऱ्यात असलेला शेख फरीद वझरा धबधबा तालुक्यातील एकमेव आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने धबधबा ओसंडून वाहत आहे. निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटकांच्या पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत असल्याने धबधब्याकडे पर्यटक येण्याची आवक घटली आहे.

माहूर तालुका म्हटलं की, पावसाळ्यात हिरवागार निसर्गरम्य परिसर. आई रेणुका मातेचे मंदिर, गोंड राजांनी बांधलेली रामगड किल्ला परिसर, प्रभू दत्तात्रयाचे निद्रास्थान परिसर, घनदाट हिरवेगार जंगल डोळ्यांचे पारणे फेडतो. विशेष म्हणजे आई रेणुका मातेच्या मंदिरापासून अवघ्या आठ किलोमिटर अंतरावर असणारा व पावसाळ्यामध्ये फेसाळत कोसळणारा वझरा शेख फरीद येथील धबधबा पर्यटकांना दरवर्षी खुणावत असतो. यंदा मात्र कोरोनामुळे पर्यटकांसोबतच भाविकांचीही गर्दी ओसरली आहे.

हेही वाचा -  नांदेडमध्ये दररोज अडीच हजार शिवभोजन थाळींचे होते वाटप

कोरोनामुळे रोडावली पर्यटकांची गर्दी
माहूरचा परिसर हा निसर्गसंपन्न आहे. संततधार पावसामुळे शेख फरीद वझरा धबधबा कोसळण्यास सुरुवात झाली आहे. निसर्गनिर्मित धबधब्याचे हे दृष्य पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक, भाविक वझरा (शेख फरीद)कडे येतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे पर्यटकांनी धबधब्याकडे पाठ फिरवली आहे. येथील हजरत शेख फरीद दर्गा दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्याही मोठी आहे. मात्र गेल्या चार महिन्यांपासून दर्गा बंद असल्याने भाविकांची गर्दी रोडावली आहे.

हे देखील वाचाच - चलतीका नाम गाडी; पहिल्याच दिवशी नांदेड आगाराला सहा लाखावर कमाई

धबधब्याचे विहंगमय दृष्य बघणे दुर्लभ
वझरा धबधबा मागील आठवड्यात झालेल्या पावसाने आता मोठ्या धारेसह ओसंडून जोमाने वाहत आहे. दर्गा परिसरात निसर्ग नटला आहे. मात्र धबधबा स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजनांची कमतरता आहे.
सेल्फीच्या नादात अनेक युवक थेट कुंडाकडे जातात. त्यामुळे धोका निर्माण होवू शकतो. गेल्या दोन-तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी होऊ लागल्याने पर्यटकांना वझरा धबधब्यांचे विहंगमय दृश्य बघणे दुर्लभ झाले होते.

येथे क्लिक कराच - हिंगोलीने मिळविला देशभरात मान, पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार वितरण

हिरवाईने नटला परिसर
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने धबधबा पाहिलाः मात्र अल्पावधीतच लुप्त झाला होता. यंदा झालेल्या दमदार पावसाने धबधबा वाहायला सुरुवात झाली आहे. धबधबा फेसाळत वाहत आहे. यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वझरा शेख फरीद धबधबा मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहत आहे. सध्या या परिसरात झाडेझुडपे हिवराईने नटली आहे. येथे वनविभागाने निधी उपलब्ध करून देऊन वन उद्यानाची निर्मिती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. 

 

संपादन ः प्रमोद चौधरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wazra Sheikh Fareed Falls Is Collapsing Without Tourists Nanded News