नांदेड : आम्ही लस घेतली, तुम्ही पण घ्या; कोरोना योध्यांचे आवाहन

file photo
file photo

धर्माबाद (जि. नांदेड) : शहरातील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (ता.२८) रोजी दुपारी एक वाजता कोरोना लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपलवार यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या २५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून गुरुवारी १०३ कोरोना योद्धांनी लस घेतली आहे. ही लस सुरक्षित असल्याचे सांगून आम्ही लस घेतली; तुम्ही पण घ्या, असे आवाहन या कोरोना योद्धांनी केले आहे.

२५७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार
कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातही लसीकरण मोहीम सुरू आहे. धर्माबाद शहरातील ग्रामीण रुग्णालयात या मोहिमेला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या पुनम पवार, प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, बाजार समितीचे संचालक तथा रुग्ण कल्याण समितीचे रमेश गौड, पंचायत समितीचे सभापती मारोती कागेरू, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे, जारीकोट नागरी दवाखाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख नसीमा बेग, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जी.पी. मिसाळे, संजय कदम, व्ही.जी. डोईवाड उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात आशा, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य विभागाच्या २५७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

अन्य शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना लसीकरण
सर्व कर्मचाऱ्यांची कोविन या ॲपवर त्यांची नोंदणी करण्यात आली असून २८४ लस उपलब्ध झाल्या आहेत. दररोज १०० कर्मचारी यांना डोस दिले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, महसूल कर्मचारी, शिक्षक व अन्य शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना लसीकरण होणार आहे. दोन डोस प्रतिव्यक्ती अशा स्वरूपात लसीकरण केले जाणार आहे.
लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक आहे. मात्र गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, १८ वर्षाखालील मुले व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना लस दिली जाणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक खंदारे यांनी दिली. गुरुवारी आरोग्य कर्मचारी पळशीराम दत्तारेड्डी यांना पहिली लस देण्यात आली. दिवसभरात १०३ कर्मचारी यांना लस देण्यात आली असून लस दिलेल्या कर्मचारी यांना एक तास ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेला आरोग्य विभागाचे डॉ. संजय पोहरे, डॉ. प्रवीण कांबळे, डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ. वेणूगोपाल पंडित, माधव झुंबड, विकास आगळे, नितीन आडे, मनीषा महामुनी, शुभांगी सूर्यवंशी, नरसिंग गोविंदवार, गणेश झगडे, जेठेवाड, अश्विनी येमुलवार, पल्लवी वाघमारे, संदीप लोट, प्रकाश कांबळे, रहीम खान यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
 

लाभार्थ्यांना दोन डोस ः
पहिला डोस घेतल्यानंतर त्या लाभार्थ्यांना अर्धा तास डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवले जात आहे. त्यानंतर कोणताही काही त्रास न जाणवल्यास ते लाभार्थी आपल्या कामावर रुजू होऊ शकतात. त्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा त्या लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्याबाबत आरोग्य विभाग त्या लाभार्थ्यांना मोबाईलवर मॅसेज पाठवून माहिती देणार आहेत.

सकाळच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -

संपादन - स्वप्निल गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com