आठवड्यानंतर रविवारी नांदेडला दिलासा; अहवाल निरंक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

रविवारी (ता. १४) सायंकाळी ९८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ९४ अहवाल निगेटिव्ह तर चार अहवाल अनर्णित अवस्थेत ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.

नांदेड : शनिवारी (ता. १३) १६३ अहवालाची लॅबमध्ये तपासणी सुरु होती. त्या स्वॅबपैकी रविवारी (ता. १४) सायंकाळी ९८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ९४ अहवाल निगेटिव्ह तर चार अहवाल अनर्णित अवस्थेत ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

रविवारी (ता. १४) पंजाब भवन यात्री निवास येथील सहा, विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील दोन व कोविड केअर सेंटर माहुर येथील एक असे नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकुण २५६ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत १३ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच ६६ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत.  

हेही वाचा-
रविवारी मिळाला दिलासा

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज नव्याने १० ते २० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व नातेवाईक यांचा शोध घेऊन प्रशासनाकडून त्यांचे स्वॅब घेतले जात होते. त्यामुळे रोज नव्याने आकडे वाढत होते. परंतु रविवारी मात्र जिल्ह्यातील ९८ स्वॅब अहवाल प्राप्त झाले असले तरी, त्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा-
६६ रूग्णांवर उपचार सुरु

सध्या २५६ रुग्णांपैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व उपचार सुरु असलेले ६६ रुग्णापैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात १७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४२, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दोन तर औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेले पाच रुग्णावर उपचार सुरु आहेत. 

जिल्ह्याची संक्षिप्त माहिती 
- एकूण क्वारंटाईन संख्या - चार हजार ५६२
- क्वारंटाईन कालावधी पूर्ण - दोन हजार ६८६
- अजून निरीक्षणाखाली असलेले - २२८
- त्यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - ११०
- घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - चार हजार ४५२
- आज घेतलेले नमुने - ७०
- एकुण नमुने तपासणी - पाच हजार १९
- एकुण पॉझिटिव्ह रुग्ण - २५६
- पैकी निगेटिव्ह - चार हजार ३४७
- नमुने तपासणी अहवाल बाकी - १३५
- नाकारण्यात आलेले नमुने - ८३
- अनिर्णित अहवाल - १९१
- कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - १७७
- कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या - १३
- जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी एक लाख ४८ हजार ५१ असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A week later, a relief report to Nanded on Sunday