
वजिराबाद : नांदेडची लोकसंख्या सात ते आठ लाखांच्या घरात असली तरी शहरात सर्व सुविधायुक्त उद्यानाची वानवा आहे. त्यामुळे चिमुकल्यांची घुसमट होत असून ज्येष्ठ नागरिकांनाही विरंगुळ्यासाठी चांगले उद्यान नाही.
आजघडीस शहरात केवळ एकच विसावा उद्यान असून तेथे मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी, सुविधांचा अभाव यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागतो. मुलांसाठी चांगली खेळणी नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांच्या शहर विस्ताराचा विचार करून सर्व सुविधायुक्त उद्यानांची उभारणी करण्यासाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.