esakal | नांदेड महापालिकेला नागरिक कृती समितीच्या काय आहेत सुचना...? वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पवित्र गोदावरी नदीच्या देखभाल व संवर्धनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिक कृती समितीने महापालिकेला काही सूचना केल्या आहेत.

नांदेड महापालिकेला नागरिक कृती समितीच्या काय आहेत सुचना...? वाचा...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महानगरपालिकेच्या नुकत्याच सन २०२०- २०२१ च्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने शहराची ओळख असलेल्या पवित्र गोदावरी नदीच्या देखभाल व संवर्धनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिक कृती समितीने महापालिकेला काही सूचना केल्या आहेत. कृती समितीच्या सुचनांचे पालन महापालिका प्रशासन किती गांभीर्याने घेते ते येणारा काळच ठरविणार आहे.  

शहरातून सांडपाणी वाहून येणारे जवळपास १३ मोठे नाले जोडल्याने गोदावरी नदीच्या प्रदूषणात वाढ होत असून हा प्रश्न सुटला पाहिजे असे समितीचे म्हणणे आहे. मागील महिण्यात याच पवित्र गोदावरी नदी पात्रात कुठल्यातरी विषबाधेमुळे हजारो मासे मृत झाले होते. त्या प्रकरणाचा अद्याप अहवाल   आला नाही. फाॅरेन्सीक लॅबकडून मिळालेला अहवाल हा नांदेडकरांना थक्क करणारा आहे.अहवालात मासे विषामुळे मृत्त झाले नाही. असा निष्कर्ष आल्याने आता प्रदुषन बोर्डाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोदावरीचे पावित्र्य जपणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. 

हेही वाचा गरिबांच्या वस्त्या वंचित, नांवाश महापालिकेचे दुर्लक्ष- नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात

कृती समितीने पालकमंत्री अशोकराव चव्हाणांना दिले निवेदन

कृती समितीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण, महापौर दिक्षा धबाले, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना  तसे निवेदन दिले आहे. शहरातून वाहत येणाऱ्या अनेक नाल्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत आहे. पाईप लाईनला समांतर दुसरी सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन केल्यास सदरचा प्रश्न सुटू शकणार आहे. यापूर्वी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती मात्र अर्थसंकल्पात आणखी अधिक निधीची तरतूद करून हे काम तडीस नेण्याची गरज असल्याचे समितीचे मत आहे. सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी कौठा येथील व्यवस्थापनात आवश्यक ते अधिक कर्मचारी नेमावेत. बोंढार येथील तलावातील मत्स्योत्पादन व्यावसायिक तत्वावर परिपूर्ण करण्यासाठी तरतूद करा व सर्वच           सांडपाणी प्रक्रिया केंद्राभोवती सफाई करून योग्य तेथे बागा वाढविण्यासाठी व संरक्षक भिंतीसाठी तरतूद करावी.

नदीच्या काठाने वृक्षलागवड सुशोभीकरण कामासाठी तरतूद करावी

गोदावरी नदीच्या काठाने वृक्षलागवड सुशोभीकरण कामासाठी तरतूद करावी, असे समितीची मागणी आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने व्हावे या कामाचे दैनंदिन मूल्यमापन व्हावे, घनकचऱ्याचे वजन ओला व सुका कचरा याचे वर्गिकरण तपासण्यासाठी सक्षम टीमची तरतूद करावी, कचऱ्यापासून व्यावसायिक तत्वावर खत निर्मिती, प्लास्टिकचे बॉक्स तयार करणारे वेगळे युनिट काढण्यासाठी तरतूद करा, व सोलार सिस्टिमचे पथदिवे लावल्यास विजेचे बिल कमी होईल. 

येथे क्लिक करा -  लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हे आहेत कृती समिती सदस्य

नागरिक कृती समितीचे समन्वयक डॉ. लक्ष्मण शिंदे, सल्लागार माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, कॉ. प्रदीप नागापूरकर, अॅड. धोंडीबा पवार,काॅ. अल्ताफ, लता बंदमवार वंदना गुंजकर, हरीश ठक्कर, महमुद आगाखान, कपिल धुतमल, गजानन राणे यांनी सुचविले आहे. दरम्यान महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करून स्थायी समितीने तो अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पावर मंजुरीची अंतिम मोहोर उठण्याआधी त्यात गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी मोठ्या रक्कमेची तरतूद केली जावी अशी अपेक्षा आहे.