
नांदेड ः महागाईचा भडका उडाल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आधीच आवश्यक वस्तूंचे भाव गगणाला भिडले असून त्यात केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची दरवाढ करुन आगीत तेल ओतले आहे. खाद्यतेलाने तर सर्वसामान्यांच्या जगण्यात भडका उडाला आहे.
उज्वला योजनेच्या नावाखाली केंद्र सरकारने गरिबांना गॅस सिलिंडरचे वितरण केले. योजनेचा खूप गाजावाजा झाला. आता सिलिंडरच्या भरमसाट दरवाढीने ग्रामीण भागातील गोरगरिबांना सिलिंडर विकत घेणे परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जुने चुलीचेच दिवस बरे होते असे म्हणण्याची वेळ योजनेतील लाभार्थ्यांवर आली आहे.
काय म्हणतात महिला
केशरबाई सोनवणे (गृहिणी) ः सिलिंडर गॅसची सवय झाल्याने तो विकत घेत असताना नाकीनऊ आले आहे. इतर वस्तूंची भाववाढ आवाक्याबाहेर झाली आहे. परिणामीसंसाराचं वाटोळं झालं या महागाईने.
भगीरथा वाळिंबे (सामाजिक कार्यकर्त्या) ः खूप गाजावाजा करुन उज्वला योजना गोरगरिबांसाठी असल्याचे सांगून मोदी सरकारने गरिबांना गॅस सिलिंडर स्वस्तात दिले. पण आज तेच लाभार्थी गॅस सिलिंडर विकत घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे.
उज्वला खरात (गृहिणी) ः आधीच्या सरकारने गोरगरिबांसह इतर वर्गाच्या तसेच सर्वसामान्य लोकांसाठी भाववाढ न करता इतर वस्तूंच्या किमती आवाक्यात ठेवल्या होत्या. पण मोदी सरकारने अतोनात भाववाढ करुन सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
सरलाताई उगले (सामाजिक कार्यकर्ते) ः गॅस सिलिंडरची भाववाढ करुन गोरगरिबांच्या पोटावर लात मारण्याचा प्रकार होत आहे. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करुन गोरगरिबांना उपाशी मारण्याचा कट केंद्र सरकारकडून केला जात असल्याचे या भाववाढीवरुन दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.