नांदेडकरांना झालय तरी काय...? दंड भरु पण मास्क नको

प्रल्हाद कांबळे
रविवार, 12 जुलै 2020

नियमांची पुरती वाट लावत आम्ही दंड भरु पण मास्क वापरणार नाही. अशा महाभागाविरुद्ध महापालिकेने धडक दंडात्मक मोहिम सुरू असून दोन दिवसात साडेअकराशे जणांकडून दीड लाखाचा महसुल जमा

नांदेड : सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संचार झपाट्याने वाढत असतांना अनेक महाभाग आपल्या दुचाकीवरून ट्रिपल, डबलसीट जात आहेत. एवढेच नाही तर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पुरती वाट लावत आम्ही दंड भरु पण मास्क वापरणार नाही. अशा महाभागाविरुद्ध महापालिकेने धडक दंडात्मक मोहिम सुरू असून दोन दिवसात साडेअकराशे जणांकडून दीड लाखाचा महसुल जमा करुन निमय तोडणाऱ्यांचा चांगलाच दणका दिला आहे. 
 
कोरोनाचा प्रसार जिल्ह्यात झपाट्याने होत आहे. तीन महिण्यात कोरोना बाधीत रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान महापालिकेने गेल्या तीन दिवसापासून एक हजार १४९ जणांकडून एक लाख ४१ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर शनिवारी (ता. ११) दिवसभरात महापालिकेच्या पथकांनी ३९४ जणांकडून ५५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचा -  जिल्हावासियांनी संचारबंदी पाळावी : पालकमंत्री अशोक चव्हाण

नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कडक मोहिम हाती घेण्यात आली

महापालिकेच्या वतीने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत पथकाची स्थापना करून ‘ब्रेक द मिशेन’ अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. विपिन व महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये लॉकडाउनचे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १० जुलै) तोंडाला मास्क नसणे, दुचाकीवर ट्रिपल, डबल सीट फिरणाऱ्या महाभागावर कारवाई केली.

३९४ महाभागांकडून ५३ हजार ९०० रुपयांचा दंड

मनपा क्षेत्रीय कार्यालयात मार्फत दंड वसूल केला तरोडा सांगवीच्या पथकाने ३२ जणांकडून तीन हजार ८०० रुपये, अशोकनगर झोनने १६० जणांकडून १९ हजार १०० रुपये, पथक क्रमांक तीन शिवाजीनगरने १८ व्यक्तीकडून एक हजार ८०० रुपये, वजीराबादझोने ४८ जणांकडून आठ हजार ९०० रुपये, इतवाराच्या पथकाने ५७ जणांकडून १२ हजार तर सिडरोच्या पथकाने ७६ जणांकडून आठ हजार ३०० रुपये असे एकूण ३९४ महाभागांकडून ५३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. 

येथे क्लिक करा - दुचाकीस्वार चोरांचा हैदोस, महिलेची पर्स लंपास

महापालिका झोन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी

ता. आठ जुलैपासून ते ता. १० जूलैपर्यंत शारिरीक अंतर न पाळणे, दुचाकीवर डबल सीट जाणे याबाबत कारवाई करण्यात आली. या कारवाईत उपायुक्त अजितपालसिंग संधू, विलास भोसीकर यांच्या नियंत्रणाखाली सर्व सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी भाग घेतला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened to Nandedkar Pay the fine but don't mask nanded news