नांदेड जिल्हा प्रशासनाला विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी काय दिल्या सुचना...? वाचा सविस्तर 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 29 July 2020

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मंगळवारी (ता. २८) व्हिडिओ काॅन्फ्रसिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोनावर प्रतिबंध घालण्याच्या सुचना दिल्या.

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाची काय आहे तयारी याबाबत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मंगळवारी (ता. २८) व्हिडिओ काॅन्फ्रसिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोनावर प्रतिबंध घालण्याच्या सुचना दिल्या. विशेष म्हणजे लिक्विड आॅक्सीजनचा एक नविन प्लांट तात्काळ उभा करा अशआ सुचना दिल्या. 

कोरोनाच्या काळात रुग्णांना आॅक्सीजनचा तुटवडा कमी पडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. कोरोना महामारीचे रुग्ण वाढत असल्याच्या  पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मराठवाड्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांसाठी लागणारा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून घ्या. ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना केंद्रेकर यांनी या बैठकीत प्रशासनाला दिल्या.

हेही वाचा मोक्कातील आरोपीस अटक, पावणेदोन लाखाचे दागिने जप्त- द्वारकादास चिखलीकर

यांची होती उपस्थिती 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. विष्णुपूरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. तसेच परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची बाब अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेली औषधे मात्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

ऑक्सिजन कमी पडणार नाही याची काळजी घ्या

दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या बैठकीत आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. प्रामुख्याने अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज असते हे लक्षात घेता ऑक्सिजन कमी पडणार नाही याची काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले. सध्या शासकीय रुग्णालयात दहा हजार लिटर एवढ्या क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट सुरु आहे. अशी माहिती अधिष्ठाता आणि दिल्यानंतर सुनील केंद्रेकर यांनी लिक्विड ऑक्सिजनचा आणखी एक नवीन प्लांट तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. याशिवाय मनुष्यबळ वाढवा तसेच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून लोकांना आयसोलेट करा आणि कंटेनमेंट झोनमधील पन्नास वर्षांवरील नागरिकांच्या अॅंटीबाॅडी टेस्टिंग करा. अशा सूचना विभागीय आयुक्तांनी या बैठकीत केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What instructions did the divisional commissioner give to the district administration Read detailed nanded news