esakal | घराबाहेरच्या भागात "शाळा बंद, शिक्षण सुरू "  काय आहे उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आदिवासी तालुक्यातील मारेगाव (वरचे) येथील उपक्रमशील कलावंत शिक्षक सुरेश पाटील विद्यार्थ्यांना घराबाहेरच्या  भिंती, पत्र्या,फरशावर लिहून देताहेत  अभ्यास

घराबाहेरच्या भागात "शाळा बंद, शिक्षण सुरू "  काय आहे उपक्रम

sakal_logo
By
स्मिता कानिंदे

गोकुंदा (जिल्हा नांदेड) : आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना अतिदुर्गम आदिवासी किनवट तालुक्यातील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारेगाव ( वरचे ) येथील उपक्रमशील कलावंत शिक्षक सुरेश पाटील यांनी गृह भेटीत विद्यार्थ्यांना घराबाहेरच्या भागात "शाळा बंद शिक्षण सुरू "  या उपक्रमांतर्गत शिक्षक जे फळ्यावर शिकवतात तेच भिंतीवर पत्र्यावर फरशा वर सोप्या भाषेत लिहून अभ्यास व स्वाध्याय देत आहेत.

यामुळे  विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार कधीही भिंतीसमोर उभे राहून अभ्यास करता येतो. या भिंतीवर अक्षर, संख्या, शब्द, वाक्य, सामान्य ज्ञान, इंग्रजी मुळाक्षरे इत्यादी विषयाचे ज्ञान त्यांनी स्वतः लिहिले आहे. विद्यार्थी मास्क लावून व योग्य ते शारीरिक अंतराचे नियम पाळून भिंती समोर हवे तेव्हा जाऊन शिकत आहेत. 

हेही वाचा हिंगोली : घरकुलांसाठी एक कोटी सहा लाखाचा निधी प्राप्त- खासदार हेमंत पाटील 

"माझी शाळा मारेगांव" हा व्हाट्स अॅप ग्रुप                     

गरीब घरातील मुलांचे आई-वडील, पालक मजुरीसाठी रानात जातात अशा मुलांसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.  "माझी शाळा मारेगांव" हा व्हाट्स अॅप ग्रुप बनवून ते ऑनलाइन गृहपाठ, नोट्स शिष्यवृत्ती तयारी अभ्यास नियमीत देतात. स्वतः संगीत विशारद असल्याने कवितांना सुमधूर चाली लावून संगीबद्ध चित्रफीती ते विद्यार्थी- पालकांपर्यंत पोहचवित आहेत. केंदिय मुख्याध्यापक रमेश खूपसे, सहकारी शिक्षक दत्ता पेटकुले, ब्रह्मसिंग राठोड, अश्वत घुले हे त्यांना सहकार्य करतात.  

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले

शिक्षणाधिकारी ( प्रा.) प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खुडे, केंद्रप्रमुख विजय मडावी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे