अहो आश्चर्यम् ! शेळीने दिला दुतोंडी पिल्याला जन्म; नांदेडच्या नाव्हा येथील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

श्री. गोपने यांनी शेत परिसरातील शेतकऱ्यांना याबाबत सांगितल्यानंतर जमलेल्या उपस्थितांनी देखील ही घटना अनोखी असून दोन तोंडे असलेले शेळीचे पिल्लू पहिल्यांदा पाहत असल्याचे सांगितले.

अहो आश्चर्यम् ! शेळीने दिला दुतोंडी पिल्याला जन्म; नांदेडच्या नाव्हा येथील घटना

तामसा ( जिल्हा नांदेड ) : नाव्हा (ता. हदगाव) शिवारातील एका शेतकऱ्याला बुधवारी (ता. ३१) दुपारी आश्चर्याचा धक्का बसला असून शेतकरी दिगंबर माणिकराव गोपने यांच्या शेतातील शेळीने चक्क दोन तोंडे असलेल्या पिल्याला जन्म दिला आहे. 

गोपने यांच्या शेळीने जन्म दिलेले पहिले पिल्लू सामान्य होते. पण दुसरे जन्मलेले पिल्लू बघून गोपने यांचा स्वतः च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. शेळीने चार- पाच पिलांना जन्म देणे, गाय किंवा म्हशीने दुतोंडी वासरांना जन्म देणे अशी दुर्मिळ घटना ऐकण्यात होती. पण दोन तोंडे असलेले शेळीचे पिल्लू जन्मने अभूतपूर्व मानले जात आहे. 

हेही वाचा - केवळ बदनामीसाठी केलेला खटाटोप आहे; मी उद्या सविस्तर बोलेल- बलात्काराच्या आरोपानंतर राजेश विटेकरांची प्रतिक्रिया

श्री. गोपने यांनी शेत परिसरातील शेतकऱ्यांना याबाबत सांगितल्यानंतर जमलेल्या उपस्थितांनी देखील ही घटना अनोखी असून दोन तोंडे असलेले शेळीचे पिल्लू पहिल्यांदा पाहत असल्याचे सांगितले. सदरील दोन तोंडाचे पिल्लू बोकड प्रजातीचे असून त्याला चार डोळे व तिनच काने आहेत. जन्मल्यानंतर सदरील पिलाने आवाज काढणे चालू केले असली तरी सायंकाळपर्यंत तो उभा राहू शकत नव्हता. त्यामुळे त्याच्या जगण्याची शक्यता कमी असल्याचे मत शेतकरी बंडू गोदगिरे यांनी व्यक्त केले. 

याबाबत तामसा येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय मुस्तरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, शेळीच्या गर्भातील सदरील पिलाची शारीरिक वाढ व्यवस्थित न होण्यामुळे हा प्रकार झाला असावा. पण ही घटना दुर्मिळ असून आपण पहिल्यांदाच असा प्रकार शेळीच्या बाबतीत ऐकला आहे. अशी पिल्ले जीवन जगण्याबाबत बहुदा दुर्देवी ठरतात.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: What Surprise Goat Gave Birth Two Toothed Piglet Incident Nava Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedHadgaon