याला काय म्हणावे ? किरकोळ भांडणातून म्हशींवर पेट्रोल टाकून जाळले

झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन अब्दुल रउफ याने रात्री साडेदहा वाजता दारु पिऊन अशोक गुमलवाड यांच्या राहत्या घरासमोर बांधून असलेल्या म्हशीच्या तोंडावर व अंगावर पेट्रोल टाकून जाळले.
किरकोळ भांडणातून म्हैसीला जाळले
किरकोळ भांडणातून म्हैसीला जाळले

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणीपासुन 12 किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या अप्पारावपेठ येथे किरकोळ भांडणातून मद्यप्राशन करुन म्हशीच्या तोंडावर व अंगावर पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना ता. 25 जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. संबंधित आरोपीवर इस्लापुर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अप्पारावपेठ येथील रहिवासी अशोक सायना गुमलवाड व अब्दुल रउफ अब्दुल रशीद या दोघांमध्ये ता. २५ रोजी सकाळी साडेसात वाजता घरासमोर ट्रॅक्टर लावल्याने वाद झाला होता. हा वाद चालू असताना येथील शेजाऱ्यांनी मध्यस्थी होऊन वाद ( भांडणाची ) सोडवा सोडवी केली होती.

हेही वाचा - कोरोना काळात दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली का, हे जाणून घेण्यासाठी पुणे महानगर गोसेवा समितीच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले.

झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन अब्दुल रउफ याने रात्री साडेदहा वाजता दारु पिऊन अशोक गुमलवाड यांच्या राहत्या घरासमोर बांधून असलेल्या म्हशीच्या तोंडावर व अंगावर पेट्रोल टाकून जाळले. त्यात मशीचे तोंड, मान व पाठीवर गंभीरपणे दुखापत झाली असून या सूडबुद्धीने घेतलेला घटनेचा अशोक घुमलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इस्लापुर पोलिस ठआण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश बोधगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत असून गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा तपास पोलिस अंमलदार बी. बी. पाटील करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com