नांदेड जिल्ह्यातील क्लासेस कधी सुरु होणार? खासगी शिकवणीचालक बेहाल 

File photo
File photo
Updated on

नांदेड : मार्च महिन्यापासून कोरोना संकट आले आणि तेव्हापासून संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले होते. मात्र, त्यातून हळूहळू समाजाच्या सर्वच क्षेत्रात योग्‍य सावधगिरी बाळगत आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत व झाले आहेत. अगदी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळाही सुरू झाल्‍या आहेत. मात्र, सरकारने अद्यापही खासगी क्‍लास चालकांना वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली नसल्‍याने हजारो क्‍लासचालक, त्यांच्या परिवारांसह इतर व्यवसायातील हजारो परिवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

हजारो परिवारांना मिळाला रोजगार

नांदेड शहर आणि जिल्ह्यात हजारो उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी सरकारी नोकरीची अपेक्षा न ठेवता आपल्या ज्ञानाच्या हिंमतीवर खासगी ट्यूशन, क्‍लास सुरू केले. विद्यार्थ्यांना आपल्‍या ज्ञानाचा फायदा करून देतानाच आपला व आपल्‍या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी या उच्चशिक्षितांनी हा मार्ग अवलंबला. आपला आणि आपल्‍या परिवाराचाच विचार न करता परिसरातील इतरही शिक्षकांना आपल्‍यासोबत जोडून त्यांच्याही उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. सोबतच ऑफिस स्टाफ, नॉन-टीचिंग स्टाफ अशा हजारो परिवारांना सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग या ट्यूशन, क्‍लास चालकांनी उपलब्‍ध करून दिला आहे. 

नांदेड शहरामध्ये दूरदुरून शिकण्यास आलेल्‍या विद्यार्थ्यांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था उभी राहिली. या व्यवसायातही आज हजारो कुटुंबांची उपजीविका चालते आहे. मात्र, कोरोना संकटामुळे अशा लक्षावधी कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा झाला आहे. आता राज्‍य शासनाने शाळा, मंदिरे, व्यायामशाळा, दारूची दुकाने, बार आदींना सुरू करण्याची परवानगी दिली आहे, तर ट्यूशन, क्‍लास चालकांनाही योग्‍य त्या नियम-अटींवर ज्ञानदान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासगी ट्युशन, क्‍लास चालक करीत आहेत. 

आमच्यावर अन्याय का? 
दारूच्या दुकानांपासून शाळेपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी देणारे सरकार खासगी ट्युशन, क्‍लास चालक आणि या शिकवणी वर्गांवर अवलंबून असलेल्‍या हजारो परिवारांच्या तोंडचा घास का हिरावून घेत आहेत?, अशी संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. 

आम्हालाही द्यावी परवानगी 
ज्‍या प्रमाणे राज्‍य शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियम व अटी पाळून सुरू करण्याची परवानगी शाळा, महाविद्यालयांना दिली त्याच धर्तीवर राज्‍यातील खासगी ट्युशन, क्‍लास चालकांनाही काही नियम व अटींसह क्‍लास सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com