esakal | नांदेड जिल्ह्यात पांढरे सोने मातीमोल, मजुराला मात्र आला मोठा भाव 
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

परतीच्या पावसामुळे कापसाच्या वाती झाल्या तो काळाही पडला. मात्र, नांदेड जिल्ह्यामध्ये आता सर्वत्र वेचण्या सुरु असून कापसाला सध्यातरी चार हजार ते चार हजार ३०० रुपये भाव आहे. या पांढऱ्या सोन्याला मिळत असलेली ही किरकोळ किंमत बघून शेतकरी हतबल झालेला आहे. 

नांदेड जिल्ह्यात पांढरे सोने मातीमोल, मजुराला मात्र आला मोठा भाव 

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  मागील काही वर्षापासून शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत असून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळात तो होरपळत आहे. यावर्षी पडलेल्या अधिकच्या पावसाने खरीपाची सर्व पिके हातची गेली. त्यातच मुग, उडीद ही पिके तर अधिकच्या पावसामुळे दिसली देखील नाही. मात्र, काही अंशी कपाशी आली तर तिचेही परतीच्या पावसाने बोंडे काळी पडले तर काही ठिकाणी बोंडे सडली.

शासनाने अवलंबित केलेल्या शेतकरी धोरणाला व्यापाऱ्यांना फाटा देत हमी भावाची थट्टा सद्यस्थितीत केली जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे शासनाच्या पाच हजार ८२५ रुपये कापूस खरेदी करा, अशा सूचना असताना व्यापारी मात्र चार हजार ते चांगला कापूस चार हजार ३०० रुपयाने खरेदी करीत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली. 

हेही वाचा - Video - नांदेडला दंडात्मक कारवाईसाठी महापालिका पथक झाले कार्यान्वित

परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून उधारीवर घेतलेले बियाणे, खते, निंदन खुरपण्याचा खर्च या तुटपुंज्या किमतीवर भागवायचा कसा या प्रश्नाने शेतकरी पुर्णतः खचला आहे. गतवर्षी दिवाळीच्या तोंडावर कापसाला पाच हजार ते पाच हजार ५०० रुपये असा भाव होता. मात्र यावर्षी या तुटपुंज्या दरावर शेतकरी नाराज असून लावलेला पैसातरी फिटेल का? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. 

हे देखील वाचाच - सतीश चव्हाण विजयाची हॅट्रिक करणार,राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा विश्वास
 
कापसाच्या दुसऱ्या वेचणीची शक्यता धुसर
उत्पादन कमी...त्यात पहिल्या वेचणीच्या कापसात ओलावा असल्याची बतावणी करून व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करीत आहेत. दुसरीकडे जादा दाम देवूनही वेचणीसाठी मजुर मिळत नाही. त्यात रोगराईचा प्रादुर्भाव वाढला असल्याने दुसऱ्या वेचणीची शक्यताही धुस्सर झाली आहे. 

येथे क्लिक कराच - Video - गंगाखेड : दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांनाही सोसाव्या लागतात यातना

कपाशीने आणले डोळ्यात पाणी 
सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पावसाने उत्तम प्रकारे साथ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र नंतर तीन महिने सारखा पाऊस पडल्याने पिकांची नासाडी झाली. यामुळे उत्पादन घटले यात उडीद, मुंग तर वाहूनच गेला उरले सुरले सोयाबीनच्या पिकाला एकरी तीन-चार कविंटलची झडती लागली. 
- रावसाहेब पाटील मुळे (शेतकरी)