का केली इतवारा ठाण्याची डीबी बरखास्त...? वाचा

file photo
file photo

नांदेड : या- ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असलेली इतवारा पोलिस ठाण्याची गुन्हे शोध (डीबी) अखेर बरखास्त करण्यात आली आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे थेट अवैध धंदेवाल्यांशी हातमिळवणी असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर या हद्दीत विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने गुटखा विक्रीवर कारवाई केली होती. शेवटी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी हे पथक बरखास्त केले आहे. 

इतवारा पोलिस ठाण्याची हद्द अवैध धंद्याचे माहेरघर असे म्हणतात. या हद्दीतील देगलुर नाका परिसरात अतिशय दाट लोकवस्ती आहे. तसेच हा परिसर तीन पोलिस ठाण्यात विभागला गेला आहे. त्यावरून अनेकवेळा आपली हद्द नाही म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकारी तिकडे फिरकत नसल्याचे पहावयास मिळते. विशेष म्हणजे देगलूर नाका भाग अधिक तर इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. या ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना बंदी असलेला गुटखा, जुगार, मटका आदी अवैध धंदे राजरोसपणे चालतात. या धंद्यांची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावरून विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी आपल्या पथकाला सुचना देऊन कारवाई करण्‍याचे आदेश दिले. 

साडेपाच लाखाचा ऐवज जप्त

या पथकानी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन देगलुर नाका परिसरात असेलल्या जनता जर्दा स्टोअर्स येथे ता. २२ मे रोजी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी विविध बारा कंपनीचा दोन लाख ५१ हजार ५०० रुपयाचा गुटखा जप्त केला. तसेच ताब्यात घेतलेल्या गुटखा माफियाकडून तीन लाख रुपये जप्त केले. ही कारवाई झाल्याने इतवारा पोलिसांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी मोहमद परवेज मोहमद युनुस, सय्यद अलीम व मोहमद अजीम मोहमद इकबाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

सर्व ठाण्यातील डीबी पथकांचे धाबे दणाणले

विशेष पोलिस महानिरीक्षकांनी पोलिस अधिक्षकांच्या मार्फत इतवारा डीबी पथकाला कारणे दाखवा नोटीस देऊन तंबी दिली होती. तब्बल आठ दिवसांनी कारवाई करत या पथकाला बरखास्त केले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ठाण्यातील डीबी पथकांचे धाबे दणाणले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com