esakal | का केला सासरच्यानी विवाहितेचा छळ?...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

माहेरून 50 हजार रुपये घेऊन असे म्हणून एका विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

का केला सासरच्यानी विवाहितेचा छळ?...वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये घेऊन असे म्हणून एका विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देगलूर नाका परिसरातील खुदबेनगर येथे रजा मशीद परिसरात राहणारी माहेरवासिनीला तिच्या सासरी बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी ५० हजाराचा मागणी करून शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. लग्नानंतर तिला काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर ता.16 जानेवारी 2020 पासून ते ता. 26 जून 2020 पर्यंत सतत तिचा मानसिक व शारीरिक त्रास करून तिला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ केली. एवढेच नाही तर तिला मारहाणही करण्यात येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित पंचवीस वर्षीय महिलेने या त्रासाला कंटाळून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. यावरून तिच्या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री नागरगोजे करत आहे.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात दुसरा पोलिस बाधीत, हदगावमध्ये पहिला रुग्ण

नायगाव शहरात 50 हजाराची चोरी

नांदेड : नायगाव शहरातील हेडगेवार चौकात असलेले दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना ता. 29 जूनच्या रात्री घडली. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव येथील हेडगेवार चौक परिसरात नागेश दत्तात्रय पुट्टा यांचे साई माऊली स्टाईल ॲंड सनिटरी वेअर फरशीचे दुकान आहे. त्यांनी आपल्या दुकानात दोन दिवस व्यापार करून ग्राहकांकडून आलेली रक्कम 50 हजार रुपये दुकानाच्या गल्ल्यात ठेवून दुकान बंद करून सोमवारी रात्री घरी गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून शटर वाकून दुकानाच्या पाठीमागील दरवाजाच्या कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. 

रोख पन्नास हजार रुपये चोरून नेले

गल्यातील रोख पन्नास हजार रुपये चोरून नेले ही बाब मंगळवारी(ता. २९)  सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकान मालक नागेश पुट्टा यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच नायगाव पोलीस ठाण्यात जाऊन दुकान फोडल्याची माहिती दिली. नायगाव पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करून नागेश पुट्टा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार श्री काळे करीत आहेत. मुख्य चौकातील दुकान फोडल्याने या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागात नेहमीच चोरट्यांकडून दुकान फोडीच्या घटना घडत असतानाही नायगाव पोलीस गस्त करण्यास कमी पडत असल्याचे सांगण्यात आले.