नांदेड जिल्ह्यातील दोघांनी का कवटाळले मृत्यूला...?

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 30 जून 2020

वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत इस्लापूर ठाण्याच्या हद्दीत कंचेली येथील तरूणास विद्यूत शॉक लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी वजिराबाद व इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांंमध्ये दोघांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना वजिराबाद व इस्लापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. २९) सकाळी आठच्या सुमारास घडल्या आहेत. 

वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरूद्वारा गेट क्रमांक एकसमोर असलेल्या सुंदर हॉटेलजवळ प्रसाद उर्फ सोनु डोलाजी भोसले (वय २७) हा राहत होता. कुठल्या तरी कारणावरून त्याने सोमवारी (ता. ३०) सकाळी आठच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या खाली लावलेल्या लाकडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वजिराबाद पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरुन पंचनामा केला. त्यानंतर तो मृतदेह विष्णूपुरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या स्वाधीन केला. गजानन बाबूराव पुलकुंडवार यांच्या माहितीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीमती मुंडे करत आहेत. 

विद्यूत शॉक लागल्याने मृत्यू 

तर दुसऱ्या घटनेत कंचली (ता. किनवट) येथील मोतीलाल श्रीराम राठोड (वय ३८) याला घरातच विद्यूत शॉक लागला. यात तो गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. तानाजी राठोड यांच्या माहितीवरुन इस्लापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. शेख करत आहेत.

हेही वाचाका केला सासरच्यानी विवाहितेचा छळ?...वाचा

महापालिकेने कर माफ करुन दिलासा द्यावा

नांदेड : कोरोना प्रार्दुभावामुळे लॉकडाऊन काळात शहरातील अनेकांचे व्यवहार ठप्प होते. त्यामुळे महापालिकेने मनपा मालकीचे तसेच खाजगी मालकीच्या गाळ्यांचा, दुकानांचा कर माफ करावा अशी मागणी भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.

महापालिका मालकी व खाजगी मालकीचे हजारो गाळेधारक व्यावसायीक आहेत. संचारबंदी काळात रेडीमेड कापड दुकान, कटलरी, जनरल स्टेअर्स, बेकरी, हॉटेल, पानपट्टी, चहा या व्यवसायीकांचे व्यवसाय संचारबंदी काळात पुर्णत: बंद होते. त्यामुळे हे व्यवसायीक कर, भाडे देण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे या व्यवसायीकांचा माहे एप्रिल ते जुनचा कर माफ करण्यात यावा. केंद्र सरकार विविध माध्यमातून नागरिकांना दिलासा देत असून याच धर्तीवर मनपाचा कर माफ करुन दिलासा द्यावा अशी मागणी भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did the two from Nanded district embrace death nanded news