Video : हिंडता कशाला..? कोरोनाची लागण होईल तुम्हाला; भारूडातून आर्त हाक... 

शिवचरण वावळे
Sunday, 24 May 2020

लोककलावंत भलेही मानधनापासून आणि शासकीय सुख सुविधांपासून वंचित असला तरी, त्याने लोककला बंद केली नाही. उपाशीपोटी का होईना अनेक लोककलावंतांनी ही परंपरा अखंडितपणे सुरुच ठेवली आहे. त्याचे मुर्तीमंत उदाहरण अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील ज्येष्ठ कलावंत माधवराव कदम आहेत. 

नांदेड: लोककला ही ग्रामीण भागाची खरी ओळख आहे. लोककलेच्या माध्यमातून लोकांना अनेक अवघड विषय सोपे करुन सांगण्याचे हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे कोरोनाला हरवायचे असेल तर घरात बसणे गरजेचे आहे. ‘घरातच रहा, सुरक्षित रहा’ असे सरकार कितीही ओरडुन सांगत असले तरी, सरकारच्या या बोलण्याचा सर्वच जनतेवर सारखा प्रभाव पडेलच असे नाही. त्यासाठी सामान्य जनतेला त्यांच्याच भाषेत समजावून सांगितल्यास ते अधिक प्रभावी ठरु शकते, हे सत्य आहे. 

गावात रोज संध्याकाळच्यावेळी सार्वजनिक ठिकाणी चावडी, मंदिर किंवा घरोघरी भजन - किर्तन असा नित्याचा कार्यक्रम असतो. परंतु, हल्ली कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, मस्जिदीत एकत्र येण्यावर बंधणे घातली गेली आहेत. त्यात रोजच कोरोना नावाचा नवीन शब्दच सतत कानावर पडत असतो. ‘कोरोना’चा आधार कोंढा येथील ज्येष्ठ लोककलावंत माधवराव कदम यांनी चक्क कोरोना बिमारी कुठुन आली अन्...दुनिया हैराण झाली असे म्हणत जनजागृतीपर गीतातून प्रबोधन सुरु केले आहे. 

हेही वाचा- Video - ताणतणाव घालवा...मेंदूचे आजार पळवा... - डॉ. संदीप देशपांडे
करुनाशी युद्ध खेळु, भीती कशाला 

ज्येष्ठ लोककलावंत माधवराव कदम हे अनेक वर्षांपासून भजन, किर्तन आणि भारुड गायन करतात. कोरोनाची बिमारी आल्याने सरकार लोकांना घरात बसण्यास सांगत असले तरी, गाव खेड्यातील लोक काही ऐकत नसल्याने श्री.कदम यांनी त्यांच्या साथीदारांना सोबत घेऊन तुनतुने, टाळ घेत ऐका मंडळी तुम्हा सांगतो दुःख झाले मोठे, करुणाचे देशावर आले संकट, घरात बसा रस्त्यावरती हिंडता कशाला, तुम्ही हिंडता कशाला, करुणाची लागण होईल हे सांगण तुम्हाला... लागण होईल झटक्यात होसाल खलास...जनतेसाठी रस्त्यावरती उभे सरकार मोदीजीची विनंती ऐका. सांगण देशाला करुनाशी युद्ध खेळु, भीती कशाला असे भन्नाट भारुड रचले आणि लोकांमध्ये जनजागृती सुरु केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why do you get infected with corona while walking Nanded News