esakal | बसस्थानकात विना मास्कवाल्यांचा सर्रास वावर, कोरोनाला निमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

बसस्थानकात विना मास्कवाल्यांचा सर्रास वावर, कोरोनाला निमंत्रण

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने शासनाकडून ब्रेक द चेनच्या नियमात बदल करून नियम शिथिल केले. त्यामुळे ठरलेल्या वेळेत अत्यावश्यक सुविधा व इतर व्यवसायाला गती मिळाली. त्याचप्रमाणे खासगी व परिवहन मंडळाच्या बसेस सुरु करण्याची परवानगीही दिली. सुरुवातीला काही दिवस नियमांना प्राधान्य दिले जात होते. परंतु, आता विना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा करून सर्रास वाहतूक सुरु आहे. शहरातील बस स्थानकावरही (Nanded Bus Stand) नियमांची ऐसीतैसी होत आहे. त्यामुळे कोरोनाचे (Corona) गांभीर्य अजून समजले नसल्याचेच वास्तव बघायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग हळुहळू कमी झाल्याने लाॅकडाउनमध्ये (Lock Down) ज्यांचे व्यवहार बंद होते त्यांची आर्थिक बाजू बळकट व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ब्रेक द चेनच्या लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणली. पाहता-पाहता बाजार गच्च भरू लागले. नको तेथे नागरिकांची गर्दी, राजकीय नेत्यांच्या आंदोलनाने प्रशासनाची झोप उडविली. ॲटोमध्येही बिनधास्तपणे विनामास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता सर्रासपणे प्रवासी कोंबले जात आहे. खेड्यापाड्यातून नागरिक लाल परीने शहरात ये-जा करतात. त्यावेळी त्यांचा संपर्क इतरांशी येतो. अशा वेळी त्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असतानाच त्यांच्याकडून सर्व नियम धाब्यावर ठेवल्या जाते.(without mask people come at nanded bus stand glp88)

हेही वाचा: बॉलिवूडलाही पडली औरंगाबादची भुरळ! २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण

धोक्याचा अंदाज बांधणे कठीण

अनेक प्रवासी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची वाट पाहत बसले असतात. अशावेळी त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंग न ठेवता तेही विना मास्क बिनधास्त जवळ बसून चर्चेत मग्न असल्याचे दिसून येत आहे. हेच प्रवासी कोरोनाची देवाण-घेवाण केल्यानंतर वेगवेगळ्या बसमधून प्रवास करतात. त्याची हीच बेफीकरी इतरांसाठी किती धोकादायक ठरु शकते यांचा अंदाज बांधणे कठिण झाले आहे.

बसस्थानक प्रशासनाने जागे व्हावे

प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगमध्ये बसण्यासाठी बस स्थानकावरील बाकड्यांवर अंतराअंतरावर गोल वर्तुळ आखले पाहिजेत. तसेच बसस्थानकाच्या परिसरात विनामास्क फिरणाऱ्या प्रवासी, वाहक-चालक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांवर बसस्थानक प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. कारण ही बेफीकरी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरणार यात काही शंका नाही. बस स्थानकावरील येणाऱ्या प्रत्येक प्रवासी व इतर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या नियमांच पालन करणे आवश्यक आहे.

loading image
go to top