स्त्रियांनी स्वत:ला कमी समजू नये- राजश्री मिरजकर

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 19 January 2021

प्रत्येक घरातली स्त्री ही कर्तबगारच असते, तिच्याशिवाय घराला घरपणच येत नसते. त्यामुळे स्त्रियांनी स्वत:ला कधीही कमी समजू नये,

नांदेड : घरातली सगळी कामं ही स्त्रीच करीत असते, तरीही तिला कोणी विचारलं तर ती सांगते की, मी काहीच करीत नाही. म्हणजेच यातून ती स्वत:चं कमीपण दाखवत असते. प्रत्येक घरातली स्त्री ही कर्तबगारच असते, तिच्याशिवाय घराला घरपणच येत नसते. त्यामुळे स्त्रियांनी स्वत:ला कधीही कमी समजू नये, असे प्रतिपादन आकाशवाणी निवेदिका राजश्री मिरजकर यांनी केले.

अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स व बहुजन मजूर कामगार आघाडीच्या वतीने सुनीलनगर, धनेगाव (ता. जि. नांदेड) येथे राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती मुक्ता साळवे यांच्या जयंती साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी राजश्री मिरजकर यांनी वरील उद्‌‌‌गार काढले.

हेही वाचा - नांदेड : निधी नसल्याने ‘उमेद’च्या योजना झाल्या नाउमेद

अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीता कांबळे यांनी आपण जिजाऊंच्या, सावित्रीबाईंच्या, मुक्ता साळवे यांच्या विचाराचे आहोत हे दाखवून देण्यासाठी, सून असाल तर सासूला आईचा दर्जा द्या आणि सासू असाल तर सुनेला लेकीचा दर्जा द्या, असं आवाहन उपस्थित महिलांना केलं. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते भाग्यश्री करंदीकर यांना अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स सिडको शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सूर्यवंशी यांनी केले, तर बालिका शिंदे यांनी आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अरूणाताई बाबळे, ज्योती भोकरे, आशा शिंदे, निर्मला गायकवाड, सविता माचेनवाड, रेखा वाघमारे, जयश्री जोगदंड, हरीबाई बाबळे, कांताबाई सूर्यवंशी, चंद्रकला गायकवाड, सुरेखा झुंजारे, दैवशाला वाघमारे, देशमुख बाई, जयश्री ननुरे, नामदेव झुंजारे, बाबू शिंदे आदींनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women should not underestimate themselves Rajshri Mirajkar nanded news