
नांदेड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded ) 18 हजार 112 सिंचन विहिरींना मंजुरी (well sanction) दिली होती. परंतु, 12 हजार 364 विहीरींचे काम पूर्ण झाले असून एक हजार 551 विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच चार हजार 197 विहिरींचे अद्यापही काम सुरु झालेले नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (Mrags scheam)जिल्ह्यात 18 हजार 112 वैयक्तीक सिंचन विहीरीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. मजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत काम सुरु करणे अपेक्षित आहे. Work on individual irrigation wells stalled in Nanded district
परंतु, वर्ष उलटूनही जिल्ह्यात चार हजार 197 विहिरींचे काम अद्यापही सुरु झालेले नाही. त्यामुळे या सिंचन विहिरीचे प्रस्ताव रद्द करून त्यांच्याऐवजी नव्याने प्रसातव पाठावावेत असे निर्देश शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यात म्हटले की, सध्या कोविड प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरात अनेक कामांना फटका बसला असला तरी विहिरीचे काम मात्र विहीत कालावधीत किंवा जास्तीत जास्त सहा महिन्याच्या आत सुरु होणे अपेक्षित असते. या योजनेतून ज्यांना वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी प्रशासकीय मान्यतेचे आदेश आणि कार्यारंभ आदेश दिले असतील त्यांनी आदेशानंतर सहा महिन्याच्या आत काम सुरु केले नाही किंवा सुरु केले नसेल तर संबंधित सिंचन विहिरीचे प्रस्ताव रद्द करावेत. त्यांच्या जागेवर नव्याने प्रस्ताव मागविण्यात यावेत, असे नियोजन विभागाचे उपसचिव दा. सो. खताळ यांनी निर्देशामध्ये म्हटले आहे.
आमच्यावर अन्याय कशासाठी
शासनाच्या या आदेशामुळे कोरोना संकटात विहिरीचे काम हाती घेण्यात अपयश आलेल्या लाभार्थ्यांकडून विहिरीचा लाभ काढून घेतला जाऊ शकतो. एकीकडे मागील वर्षभरात काम करण्यात अडचणी आलेल्या ठेकेदार आणि करदात्यांना महाराष्ट्र शासन मुदतवाढ तसेच इतर सवलती देत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत असा अन्याय कशासाठी असा प्रश्न आता लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे.
तालुकानिहाय सिंचन विहीरींचा तपशील
तालुका - मंजुर विहीरी
अर्धापूर- 396, भोकर- 785, बिलोली- 166, देगलूर- 495, धर्माबाद- 355, हदगाव- 1556, हिमायतनगर- 682, कंधार- 1, 991, किनवट- 2, 659,लोहा - 2, 600, माहूर- 2, 213, मुदखेड- 322, मुखेड- 1, 107, नायगाव- 1, 722, नांदेड- 205, उमरी- 858 अशा एकूण- 18, 112
दृष्टिक्षेपात
- एकूण ग्रामपंचायती - एक हजार 309
- एकूण मंजूर विहिरी - 18 हजार 112
- काम पूर्ण झालेल्या विहिरी - 12 हजार 364
- प्रगतीपथावरील विहीरी - एक हजार 551
- अद्यापही काम सुरु झाले नाही - चार हजार 197
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.