esakal | जागतिक जलदिन : नांदेड जिल्ह्यात जनजागृती सप्ताहाचा जागर  
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

जागतिक जलदिनानिमित्त आजपासून जिल्ह्यात पाण्याच्या वापराविषयी जिल्हा परिषदेच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

जागतिक जलदिन : नांदेड जिल्ह्यात जनजागृती सप्ताहाचा जागर  

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करुन त्याचा सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सोमवार (ता.२२) ते शनिवार (ता.२७ मार्च) पर्यंत जिल्ह्यात जनजागृती सप्ताहाद्वारे जागर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

वर्षा ठाकूर म्हणाल्या की, दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. त्या अनुषंगाने पाण्याचे महत्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते चार एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धता, पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदीबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांमध्ये जागर केला जाणार आहे.  

असा असेल कार्यक्रम

  • २२ मार्च रोजी तालुकास्तरावरील नियोजन बैठकीमध्ये जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शपथ देऊन शुभारंभ करणे.
  • २३ मार्च रोजी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे. 
  • २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजीटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे.
  • २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दुषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे.
  • २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल माहिती देणे.
  • २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शुन्य गळती मोहिम, नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे.

जल सप्ताहादरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनेबाबत केलेल्या प्रचलित नियमानुसार व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड

नांदेड जिल्ह्यातील इतरही बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top