Video : यंदाचा गणेशोत्सव संकटात, मूर्तिकार अडचणीत

Nanded News
Nanded News

नांदेड : गणेशोत्सवामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या तीन महिने आगोदर सुरू होणाऱ्या कामाचा अद्यापही कच्च्या मालाअभावी श्रीगणेशा झालेला नाही. याचा जिल्ह्यातील सुमारे २०० वर मूर्तिकारांवर परिणाम होणार आहे.

दिवाळीपासूनच गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरु होत असते. मार्च-एप्रिलपासून सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशमूर्ती बुक केल्या जातात. परंतु, यंदा कोरोनामुळे सार्वजिक गणेश मंडळांना परवानगी मिळते की नाही? म्हणून मोठ्या मूर्ती बुक झालेल्या नाही. परिणामी मोठ्या मूर्ती कारखान्यामध्ये तशाच पडून असून, घरगुती गणेशमूर्तीं रंगविण्यात सध्या मूर्तिकार व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील कौठा परिसरातील मूर्तिकार प्रफुल बडवणे यांनी सांगितले की, लाॅकडाउनमुळे अद्यापही माती मूर्तिकार आणू शकले नाही. लाॅकडाउन जरी उठले तरी मालच नसल्यामुळे पुरवठादार माल कसा पुरवणार? असा प्रश्न आहे. साधारणतः गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदर गणेशमूर्तीच्या कामाला सुरुवात होते. यंदाचा गणेशोत्सव आॅगस्ट महिन्यात येत आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला एप्रिलपासून प्रारंभ होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाचा परिणाम गणेशमूर्तीच्या निर्मितीवरही झाला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मातीतूनच मूर्तीची निर्मिती तीही घरगुती गणेशमूर्तीची निर्मीती केली जात आहे. 

हे देखील वाचाच - ‘या’ आमदारांनी घेतली सॅनिटायझरची फवारणी हाती
 
यंदा मोठ्या मूर्तीच्या संख्येत कोरोनामुळे घट होणार असल्याची शक्यता मूर्तिकार प्रफुल बडवणे यांनी वर्तविली आहे. दरवर्षी शहरात गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने मूर्ती विक्री होत असते. काही मूर्ती जिल्ह्यातील विविध गावांमधून देखील येतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या गणेशोत्सवाच्या उलाढालींवरच त्याचा परिणाम आगामी काळात अधिक जाणवण्याची शक्यता आहे. शहरात अनेक कारागीर गणेशमूर्तीसहित देखाव्यांच्या मूर्तीही घडवितात. त्यांचे नियोजन एप्रिल-मे महिन्यापासूनच सुरू होते. काही कारागीर कोरोनाच्या धास्तीमुळे गावाकडे निघून गेले आहेत. शिवाय गणेशमूर्तीसाठीच्या आॅर्डरही नाहीत. 

येथे क्लिक कराच - Video : झिरो बजेट शेती ठरतेय शेतकऱ्यांसाठी आदर्श, कशी? ते वाचाच - ​

मूर्ती प्रक्रियेवर परिणाम
मूर्ती बनविण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळ खाऊ असल्याने मूर्तिकार दिवाळीनंतर घरगुती मूर्ती बनविणे सुरू करतात. एप्रिलमध्ये या मूर्तींना रंगरंगोटीचे काम सुरु केल्या जाते. मात्र, लाॅकडाउनमुळे या सर्व प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.

घरगुती गणपती बनविणारे काही मूर्तिकार वर्षभर काम करतात. तर, काही मूर्तिकार हंगामी स्वरूपात काम करतात. या दरम्यान मूर्तिकारांचे संपूर्ण कुटुंब या कामात गुंतलेले असतात. परंतु, यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने आमच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
- प्रफुल बडवणे, (मूर्तिकार, कौठा नांदेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com