कार्यकर्त्यांना वेळा अमावस्येच्या करीची उत्सुकता; निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, बहुतांश गावात थेट लढत

अमोल जोगदंड
Tuesday, 12 January 2021

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत तर काही ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र आहे.

मालेगाव (नांदेड) : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. उमेदवाराचे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरू आहे. काही उत्साही तरुण कार्यकर्ते चहा पाण्यापेक्षा गावरान मांसाहारी भोजनाचा आग्रह करीत आहेत. त्यात वेळा  अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी येणार्‍या करीचा योग आल्याने कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढली आहे.

नांदेडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत तर काही ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र आहे. निवडणूक म्हटले की, उमेदवाराच्या खिशाला झळ पोहोचत असते. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खर्चावर मर्यादा असल्याने मागच्या हाताने जपून उमेदवारांना खर्च करावा लागतो आहे. त्या त्या गावातील प्रभाग निहाय संख्या वरून प्रत्येक उमेदवारांना खर्चाची मर्यादा आहे. 25 ते 45 हजारापर्यंत खर्चाची मर्यादा आहे. त्याला ताळेबंद जुळवण्यासाठी उमेदवारांना हिशोब ठेवावा लागत आहे. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांनी वेळेत खर्च दाखल न केल्याने प्रशासनाने त्यांच्यावर पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा निर्णय झाल्याने या निवडणुकीत निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीकडून प्रयत्न होत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

15 जानेवारीला मतदान असल्याने तीन दिवस शिल्लक आहेत. मंगळवार शेत शिवारात वेळा अमावस्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने परगावाहून गावाकडे आलेल्या काही मतदारांच्या गाठीभेटीची संधी उमेदवारांना मिळणार आहे. दरम्यान बुधवारी वेळा अमावस्याची कर आहे. करेला थोडे जपून शुभ कार्याला बंधन असे ग्रामीण भागात नेहमी बोलले जाते. मात्र यंदाची कर अमावस्येच्या मुळावर आली आहे. कार्यकर्त्यांना आग्रह पूर्ण करण्यासाठी बराच उमेदवारांना करेच्या भोजनाचा वेळ आखावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young activists in the Gram Panchayat elections are urging non vegetarian meals rather than tea water